<p>अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस पथकावर दरोडेखोरांचा गोळीबार झालाय. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला. सुदैवाने या गोळीबारात कुणीच जखमी झालेलं नाहीय. तसंच या गोळीबारावर पोलिसांनी मौन बाळगलंय. या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केलीय. मात्र या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.&nbsp;&nbsp;</p>Source link