Amravati : काँग्रेस आमदाराच्या कारच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू, कापूस वेचून घरी जाणाऱ्या ट्रकला धडक
अमरावती जिल्ह्यात लखापूर फाट्यावर काँग्रेस आमदाराच्या कारच्या धडकेत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकरी आणि शेतमजूर हे शेतातला कापूस वेचून घरी ट्रॅक्टरने जात होते. त्यावेळी आमदार बळवंत वानखेडे यांच्या कारने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की ट्रॅक्टरमधील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. इतर दोन महिला जखमी झाल्या. या अपघातात आमदार वानखेडे यांनाही किरकोळ दुखापत झालीय. आमदार वानखेडेंच्या वाहनासमोर आमदार यशोमती ठाकूर यांची गाडी होती.Source link