<p>Amravati Accident &nbsp;: अमरावतीत एका कुटुंबातील सहाजणांना कारची धडक देऊन उडवले<br />अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात एका कुटुंबांतील सहा जणांना कारने उडवल्याची घटना घडलीय.. पूर्ववैमनस्यातून रागाच्या भरात कुटुंबातील सहा सदस्यांचा अंगावर कार घातली..कारच्या या धडकेत तिघांना जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. धक्कादायक म्हणजे तीन जणांची कारनं हत्या करून आरोपी कार घेऊन तिथून निघून गेला. त्यानंतर मृतांचे नातेवाईक तिथं जमा झाले. त्यांना रुग्णालयात नेताना आरोपी पुन्हा कार घेऊन आला, आणि तीन नातेवाईकांवरही गाडी घातली, यात हे तिघं गंभीर जखमी झाले. कार अनेकदा पुढे-मागे करत आरोपीनं वारंवार त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान आरोपी नाचोना गावातच अवैधरित्या दारूचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर येतेय.&nbsp;</p>Source link