Gold Mines Found In Odisha : भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण ओडिशा राज्यात सापडली आहे. ओडिशा मधील अनेक जिल्ह्यांत सोण्याच्या खाणी सापडल्या आहेत. सरकार लवकरच या  सोन्याच्या खाणीचा लिलाव करणार आहे. ओडिशामध्ये सापडलेल्या या खाणीमुळे देशाची आर्थिक भरभराट होणार आहे. खाण मंत्री बिभूती भूषण जेना यांनी ओडिशा विधानसभेत याबाबत बोलताना ओडिशाच्या वाढत्या खनिज संपत्तीवर तसेच संभाव्य आर्थिक फायद्यावर भाष्य केले.

ओडिशामधील सुंदरगड, नबरंगपूर, अंगुल आणि कोरापूटमध्ये अशा अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी आढळल्या आहेत. सर्वेक्षणादरम्यान येथे सोन्याचे मोठे साठे आढळेले आहेत. प्राथमिक सर्वेक्षणात मलकानगिरी, संबलपूर आणि बौद्ध जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असल्याचे दिसून आले आहे. 

येथे आणखी सोन्याच्या खाणी शोधल्या जात आहेत. जशीपूर, सुरियागुडा, रुआंसी, इडेलकुचा, मरेदिही, सुलेपत आणि बदामपहार येथे नविन सोन्याचे साठे सापडले आहेत. यापूर्वी देवगडच्या आदासा-रामपल्ली परिसरात तांब्याच्या जी-२ स्तरावरील शोध दरम्यान भारतीय भूगर्भ सर्वेक्षण (GSI) ने सोन्याचे साठे आढळून आले.

मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे आढळून आल्याने ओडिशा हे देशातील मोठ्या सोन्याच्या खाणी असलेल्या देशांच्या यादीत सामाविष्ट झाले आहे.  केओंझार जिल्ह्यातील गोपूर-गाझीपूर, मानकडचुआन, सालेकाना आणि दिमिरिमुंडा भागातही सोन्याचे साठे शोधले जात आहेत. ओडिशा देवगडमधील पहिल्या सोन्याच्या खाण ब्लॉकचा लिलाव करण्याची तयारी सुरु आहे. राज्याच्या खनिज क्षेत्रासाठी हे एक ऐतिहासिक महत्त्वाचे ठिकाण आहे. 

सोने काढण्याच्या क्षमतेसाठी जीएसआय आणि ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन केओंझारमधील मानकडचुआन, सालेकाना आणि दिमिरिमुंडा येथे संशोधन करत आहेत. व्यावसायिकीकरणाचे प्रयत्न सुरू करण्यापूर्वी तांत्रिक समित्या अंतिम अन्वेषण अहवालांचे पुनरावलोकन करणार आहेत.

मयूरभंजमधील जशीपूर, सुरियागुडा आणि बदामपहार भागात प्राथमिक सर्वेक्षण सुरू आहे. तर, देवगडमधील जलाधीही भागात जीएसआय तांबे-सोन्याचा शोध घेत आहेत. केओंझार परिसरातील गोपूर-गाझीपूर सोन्याच्या खाणीचे मूल्यांकन पूर्ण झाल्यावर लिलाव केला जाणार आहे.  

 





Source link