Amravati News : एखादी व्यक्ती करोडपती झाली की त्याचं राहणीमान बरंच काही बदलून जाते. मात्र अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव (Anjangaon) सुर्जी येथील बबिता ताडे (Babita Tade) याला अपवाद ठरल्या आहेत. करोडपती होण्याआधी त्या शाळेत खिचडी बनवायच्या, पण करोडपती झाल्यावरही त्या आजही खिचडी बनवायचं काम त्या करताय. सोबतच बबिता ताडे या त्याच शाळेत ट्रेनी टिचर म्हणून नोकरी करताय आणि ती नोकरी कायमस्वरूपी करण्यासाठी बीएडचं शिक्षण पण घेताय. अशा या बबिता ताडे यांच्या शिक्षणाची जिद्द आणि जमिनीशी जुळलेली त्यांची नाळ बघता सऱ्यांनी त्यांचे कौतुक केलं आहे.

करोडपती झाल्या तरी जमिनीशी जुळून राहिली नाळ

अंजनगाव सुर्जी येथील बबिता ताडे या पंचफुलाबाई हरणे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात खिचडी बनवण्याचं काम करत होत्या. यासाठी त्यांना महिन्याला 1500 रुपये महिना मिळत होता. कोण बनेंगा करोडपतीमध्ये (Kaun Banega Crorepati) त्या 2019 मध्ये एक करोड रुपयाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन त्या करोडपती झाल्या. यावेळी अभेनेता अभिताभ बच्चन यांनी बबिता ताडेचं तोंड भरून कौतुक ही केलं. खिचडी बनविणाऱ्या बबिता ताडे आज त्याच शाळेत टिचर म्हणून नोकरी तर करतातच, सोबतच खिचडी बनवण्याचं काम त्यांनी अजूनही सोडलं नाही.

करोडपती झाल्यानंतर संस्थेने शाळेतील मुलांना बबिता ताडे यांचं नॉलेज मुलांना मिळावं म्हणून त्यांना ट्रेनी टिचर म्हणून ज्युनिअर कॉलेजमध्ये नोकरी दिली आणि आता तीच नोकरी कायमस्वरूपी व्हावी यासाठी 45 वर्षीय बबिता ताडे बीएडचं शिक्षण पण घेताय. सध्या बबिता ताडे या घराचं कामकाज करून शाळेत खिचडी बनवायचं काम करतात. त्यांनतर ट्रेनी टिचर म्हणून विद्यार्थ्यांना शिकवितात आणि त्यानंतर कायमस्वरूपी टिचर बनण्यासाठी बीएडचं शिक्षण घेण्यासाठी त्या कॉलेजला जातात. 

खिचडी बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान सन्मानजनक मानधन तरी मिळावं

बबिता ताडे करोडपती झाल्यावर ही त्यांचं स्वभाव आजही जसाच तसं आहे. सगळ्यांशी नम्रपणे बोलणे, विद्यार्थ्यांना आवडीने खिचडी खाऊ घालणे इत्यादी. पण यावेळी त्यांनी सरकारकडे महत्वाची मागणी केलीये की, सरकारने राज्यभरातील शाळेत खिचडी बनवणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना केवळ 2500 रुपये मानधन मिळते जे अतिशय कमी आहे. यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांइतका पगार किंवा सन्मानजनक मानधन तरी मिळावं, अशी मागणी त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून केलीये.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link