Amravati News अमरावती : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असणारी अमरावती लोकसभेची (Amravati Lok Sabha Election 2024) जागा विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यासाठी सोडण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. एक महिला चेहरा म्हणून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याबाबत केंद्रीय पार्लमेंट बोर्डाकडून शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीपूर्वक माहिती समोर आली आहे. नवनीत राणा ह्या आगामी लोकसभा निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टीकडून रिंगणात उतरणार की, भाजपच्या चिन्हावर उभ्या राहणार, अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होती. मात्र, काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणा यांना तातडीने नागपूरला बोलावून घेतलं.

यावेळी दोन तास आमदार रवी राणा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली, इतकीच माहिती रवी राणा यांनी दिली असली तरी मिळालेल्या माहितीनुसार नवनीत राणा यांची भाजप कडून उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा 2024 ची लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे.  

महिला चेहरा म्हणून नवनीत राणा यांना उमेदवारी

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात भाजप किती जागेवर लढणार आणि मित्र पक्षांना किती जागा देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच गेल्या कित्येक दिवसांपासून प्रचंड चर्चेत असणारी अमरावती लोकसभेची ही जागा भाजप घटक पक्ष म्हणून युवा स्वाभिमान पक्षासाठी सोडणार, की थेट राणा दाम्पत्य भाजपमध्ये प्रवेश करत भाजपच्या तिकिटावर ही लोकसभा लढवणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. परंतु, आमदार रवी राणा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल झालेल्या भेटीमुळे या चर्चाना आता पूर्णविराम लागण्याची शक्यता बळावली आहे.

आमदार रवी राणा यांनी काल रात्री तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नागपूरला रवाना झाले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रवी राणा यांच्यात भेट झाली असून खासदार नवनीत राणा यांच्या भाजपा उमेदवारीवरून फडणवीस आणि आमदार रवी राणा यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत अधिक बोलणे आमदार रवी राणा यांनी टाळले असले तरी खासदार नवनीत राणा 2024 ची लोकसभा निवडणूक ही भाजपकडूनच लढवणार हे जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

माझी निवड म्हणजे अतिशय आनंदची गोष्ट- नवनीत राणा

याविषयी खासदार नवनीत राणा यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, मी रात्री काल रात्री देवेंद्र फडणवीस आणि रवी राणा यांच्यात झालेल्या चर्चेत सहभागी नव्हती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल एकच सांगते,  ते नेहमी माझ्यासोबत राहतील. मी कमळावर लढणार की नाही हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि रवी राणा हे ठरवतील. कारण आई वडिलांवर शंका घेणं हे चुकीचं आहे. जर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ठरवलं तर मी शंका घेणार नसल्याचे नवनीत राणा  म्हणाल्या. महिला चेहरा म्हणून जर माझी निवड पंतप्रधान आणि अमित शहा यांनी केली असेल तर, माझ्यासाठी आणि अमरावतीसाठी ही अतिशय आनंदची गोष्ट असल्याचे सूचक विधान देखील त्यांनी केले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..Source link