Sharad Pawar : मला राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनासाठी निमंत्रण आलेले नाही, माझी काही श्रद्धेची ठिकाणं आहेत, तिथे मी जातो. धार्मिक ठिकाणी जाण्याचा प्रश्न व्यक्तीगत आहे. ते मी जाहिरपणे सांगत नाही. भाजप राम मंदिराच्या नावावर राजकारण करत आहे की, व्यापार मला माहिती नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत. शिवसेनेचे बाबरी मशीद पाडण्यात योगदान आहे की नाही? या मुद्यावर वाद घालण्याची गरज नाही, असेही पवार म्हणाले. ते अकोला येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

शरद पवार म्हणाले, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली. उर्वरित काही भागात त्यांनी यात्रा करावी, अशी सूचना आम्ही इंडिया आघाडीच्या बैठकीत केली होती. तीन राज्याच्या निवडणुकांचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही. याचा अर्थ असा नाही की, आगामी लोकसभा निवडणुकीत लोक आम्हाला नाकारतील. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन जर काम केलं, तर लोक आम्हाला पर्याय म्हणून नक्कीच स्वीकारतील. आम्ही एकत्रपणे इंडिया आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाणे महत्वाचे आहे. त्या कामाला आम्ही सुरुवात देखील केली आहे. 

प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घ्यावे, असे सूचवले होते – शरद पवार 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि काँग्रेस एकत्र बसून चर्चा करणार आहोत. त्यानंतर जागा वाटपाबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. इंडिया आघाडीची बैठक झाली त्यावेळी प्रकाश आंबेडकरांशी (Prakash Ambedkar) संपर्क साधावा आणि निवडणुकीला सामोरे जाताना त्यांनाही सोबत घ्यावे, असे मी सूचवले होते. आमच्यात एकवाक्यता यावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. 

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, नाना पाटेकर यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात येणार आहे? हे तुमच्याकडूनचं ऐकतोय. माझ्याकडे याबाबत कोणतीही माहिती नाही. बच्चू कडूंनी दिलेल्या आमंत्रणाबाबतही पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.  एखाद्या विधानसभा सदस्याने चहासाठी बोलावल्यानंतर त्याबाबत एवढी चर्चा करण्याची गरज नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.  1977 च्या निवडणुकीनंतर जनता पक्ष स्थापन झाला होता. त्यापूर्वी कोणीही पंतप्रधानपदासाठी उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, याची गरज नाही, असेही पवार यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Nitin Gadkari On Sharad Pawar : … म्हणून महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची स्तुतीसुमनेSource link