आज राज्यासह देशभरात गणेश उत्सवाचे आनंददायी वातावरण असताना अमरावतीच्या परतवाडा येथून एक अपघाताची बातमी समोर आली आहे.
अमरावतीच्या परतवाडा येथे दोन मजली जीर्ण इमारत कोसळली आहे.
या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून 74 वर्षीय वृद्ध आशा उमेकर यांचा मृत्यू झालाय.
तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.
मुसळधार पावसामुळे आणि जीर्ण झाल्याने इमारत कोसळली असल्याची प्रथमिक माहिती पुढे आली आहे.
सध्या घटनास्थळी परतवाडा पोलीस आणि जिल्हा आपत्ती पथक दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत आधीच जीर्ण झाली होती.
दरम्यान, अलिकडे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे ही इमारत अधिक कमकुवत झाल्याचे बोलले जात आहे.
सध्या घटनास्थळी पोलीस आणि जिल्हा आपत्ती पथक दाखल झाले असून बघ्यांचीही मोठी गर्दी झाली आहे.
तर जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार केले जात आहे
Published at : 07 Sep 2024 01:39 PM (IST)
महाराष्ट्र फोटो गॅलरी
अधिक पाहा..