अमरावती : नवनीत राणा (Navneet Rana) या गेल्यावेळी माझ्या मतांवर खासदार झाल्या होत्या, यावेळी मतं काढून घेतल्यावर त्या पडल्या अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकुर (Yashomati Thakur) यांनी राणांना टोला लगावला. गेल्यावेळी आम्ही त्यांना मतं दिली, ती यावेळी काढून घेत आमची ताकद दाखवली असंही त्या म्हणाल्या. यशोमती ठाकुर या पंढरपूरमध्ये आल्या असता एबीपी माझाशी संवाद साधला.   

गेल्या वेळी सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या नवनीत राणा या आपल्या मतावर अमरावतीतून खासदार झाल्या होत्या. पण यावेळी आमची मते काढून घेतल्यावर पडल्या असं यशोमती ठाकुर म्हणाल्या. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी पराभव केला आहे. 2019 सालच्या निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून गेल्या होत्या. पण निवडणूक झाल्यानंतर त्यांनी भाजपला साथ दिली. त्याचा वचपा आता महाविकास आघाडीने काढला आणि राणांचा पराभव झाला. 

येणारी विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून सत्ताही जिंकणार असल्याचा दावा आमदार यशोमती ठाकुर यांनी केला. 

लाडकी बहीण योजना चुनावी जुमला

महायुतीकडून निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेली लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीपासूनच अडचणी येत असून अर्थ विभागानेही त्याला विरोध केल्याचे समजते आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता ही योजना निवडणुकीनंतर गुंडाळली जाईल आणि हा फक्त चुनावी जुमला राहील असा टोला यशोमती ठाकूर यांनी लगावला. 

या आधी नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकुर यांच्यावर टीका केली होती. मी जे काही करते ते ओरिजनल आहे. आता ब्रँडला कॉपी करणारे खूप सारे कॉपी घेऊन जातात, पण ब्रँड हा ब्रँड असतो असे म्हणत नवनीत राणांनी यशोमती ठाकूर यांना टोला लगावला होता. माझा कोणासोबतही सामना नाही, मी माझ्या जनतेची सेवा करण्यासाठी या क्षेत्रात आली आहे. ती सेवा मी शेवटच्या श्वासापर्यंत करणार असं नवनीत राणांनी म्हटलं होतं. 

ही बातमी वाचा:

                                                                            

अधिक पाहा..



Source link