Lok Sabha Election 2024: देशभरात लोकसभा निवडणुकांची आचार संहिता लागू करण्यात आली असून सर्वत्र प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अशातच आज फोर्स मोटर्सकडून एका वर्तमानपत्रात पहिल्याच पानावर जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून त्यात भारतीय सशस्त्र दलाचे नाव, छायाचित्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) फोटोचा वापर करण्यात आला आहे. ही जाहिरात म्हणजे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असून या प्रकरणी आक्षेप घेत वंचित बहुजन युवा आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी सी व्हिझील वर तक्रार दाखल केली आहे. सोबतच या प्रकरणाची वेळीच दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील वंचितकडून करण्यात आली आहे.

आचारसंहिता भंग केल्याचा वंचितचा आरोप

आदर्श आचारसंहिता असताना सैन्य दलाच्या छायाचित्र आणि नाव वापरून कुठलीही जाहिरात प्रकाशित करता येत नाही. मात्र तरीही आज जवळ जवळ सर्व जिल्हा आवृत्ती मध्ये पहिल्या पानावर फोर्स मोटर्सकडून जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भाजपच्या ‘आत्मनिर्भर भारत ‘ ह्या घोषवाक्य आणि प्रधानमंत्री मोदींचे छायाचित्र देखील आहे. सदर जाहिराती मध्ये “आत्मनिर्भर” भारताच्या संकल्पनेला सशक्त करणारा फोर्स, संरक्षण क्षमतांमध्ये भारताला आत्मनिर्भर बनवल्याबद्दल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानतो. असा आशय लिहलेला आहे. सोबतच  फोर्स मोटर्सला भारतीय सशस्त्र दलांसाठी खास विकसित केलेल्या लाईट स्ट्राइक व्हेइकल्स (एलएसव्ही) चा पुरवठादार असल्याचा सार्थ अभिमान आहे. असे नमूद करून फोर्स मोटर्सच्या वेबसाईटची लिंक देखील देण्यात आली आहे.

गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी 

हा अतिशय गंभीर प्रकार असून या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी आता वंचितने केली आहे.  भारतीय आर्म फोर्सेसचे नाव, छायाचित्र एका खाजगी कंपनीने केवळ वाहन पुरवठा केले म्हणून निवडणुक काळात भाजपचे आणि मोदीच्या प्रचार करण्यासाठी वापरणे,  हा सरळ सरळ देशद्रोह असून लोकसभा निवडणुकीचे निष्पक्ष निवडणुकीवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारा आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणुक आयुक्तांनी जाहीर केल्या नुसार 90 मिनिटात कार्यवाही करून फोर्स मोटर्स व्यवस्थापन विरूद्ध गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा देखील वंचित युवा आघाडीचे वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link