Akola Accident News : अकोल्यात चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झालाय. यामध्ये चारचाकी वाहन थेट नदीच्या पुलाचे कठडे तोडून पुलाखाली कोसळली आहे. अकोल्यातल्या वाडेगाव बाळापुर रस्त्यावर हा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातात तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी आहे. वाहनातील कन्हैयासिंग ठाकूर (वय 54), विशाल भानुदास सोलनकर (वय 45) आणि सुनील शर्मा (वय 45) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची नाव आहेत. तर आशिष कन्हैयासिंग ठाकूर हे गंभीर स्वरूपात जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या अकोल्याचे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र या अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाघाडी नदीच्या पुलावरून थेट कार खाली कोसळली
पुढे आलेल्या माहितीनुसार, अपघातात मरण पावलेली व्यक्ती हे बाळापुर शहरातील रहिवासी आहे. दरम्यान, अकोल्यातल्या बाळापूर वाडेगाव रस्त्यावरील कुपटा नजीकच्या वाघाडी नदीच्या पुलावरून थेट कार खाली कोसळली आहे. वाडेगावकडून बाळापुरकडे जात असताना मध्यरात्रीच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडलीये… मिळालेल्या माहितीनुसार, पातूर MH 30 ऐ-झेड 7557 क्रमांकाची कार थेट नदीच्या पुलावरील कठडे तोडून पलटी झाली आहे. घटनेची माहिती मिळतच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई सुरू केलीय. यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकही जमेल होते.
ट्रॅव्हल्समधून प्रतिबंधित कपाशी बियाण्याची तस्करी; राज्यातील सर्वात मोठी कारवाई
खरीप हंगाम तोंडावर असताना अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वेलकम पॉईट चौकामध्ये गुजरातच्या अहमदाबादमधून एका ट्रॅव्हल्समध्ये प्रतिबंधित एचटीबीटी या कपाशी बियाण्याची तस्करी होत होती, अशी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे विभागीय कृषी सहसंचालक विभागाच्या भरारी पथकाने थेट कारवाई करत या ट्रॅव्हल्समध्ये शासन मान्यता नसलेले अनधिकृत एचटीबीटी बियाण्याचा एकूण 50 पांढरे कट्टे, प्रति कट्ट्यात 50 पाकीट प्रमाणे 2500 पाकिटे आणि प्रिंटिंग केलेले चार कट्टे जप्त केले आहेत. ज्याची अंदाजीत रक्कम 25 लाख रुपयाचा आढळून आली आहे. कृषी विभागाकडून हा साठा जप्त करण्यात आलेला आहे. दरम्यान ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात असून गुजरातच्या अहमदाबादमधून प्रतिबंधित एचटीबीटीच बियाणे राज्यात येत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..