Akola Crime:अकोला जिल्हा पुन्हा हत्याकांडाने हादरून गेलाय. अकोल्यात सलग दुसऱ्या हत्या झाली आहे. एका 22 वर्षीय तरुणीची चाकू भोकसून हत्या करण्यात आली आहे. मंगेश बिहारीलाल ढीगर असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर 30 वर्षीय सेवकराम पतिराम साकोम असं मारेकरी आरोपीचे नाव आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या वस्तापूर गावात रात्री उशिरा हे हत्याकांड घडलंय. मृतक आणि मारेकरी हे दोघेही वस्तापूर गावातील रहिवासी आहे. (Akola News)
नेमकं काय घडलं?
वस्तापूर गावात काल आठवडी बाजार भरला होता, याच दरम्यान बाजारात खरेदीसाठी आलेला मृतक मंगेश आणि मारेकरी सेवकराम या दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून शाब्दिक वाद झाला.. दोघांमधील वाद चांगलाच विकोपाला गेला, अन वादाचं रूपांतर हत्येपर्यंत पोहचलं. सेवकरामने सायंकाळी झालेला वादाचं कारण मनात साठवून ठेवलं, काल रात्रीच्या वेळी सेवकरामने मंगेशला एकटं बघितलं अन त्याला कायमचं सपवलं. त्याच्या पोटात आणि छातीवर गंभीर वार केल्याने मंगेश रक्ताच्या थारोळ्यात पडला.. आणि त्याचा या हल्ल्यात अंत झाला. दरम्यान, या प्रकरणात श्रीकांत चैत्राम तोटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू केलाय. दरम्यान, आरोपीच्या घरासमोर वस्तापूर रस्त्यावर हे हत्याकांड घडलं असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दिल्लीच्या प्रसिद्ध टॅटू आर्टिस्टची अकोल्यात निर्घृण हत्या
दिल्लीची रहिवासी असलेल्या 26 वर्षीय प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट शांतीक्रिया प्रशांत कश्यप (वय 26) हिची अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. तब्बल 11 महिन्यांनंतर या प्रकरणातील मारेकरी चेतन महादेव शृंगारे याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. शांतीक्रिया आणि चेतनची ओळख सोशल मीडियावर झाली होती. चेतनने तिला कामाच्या आमिषाने मूर्तिजापुरला बोलावले होते. काही दिवस ते दोघे प्रतिक नगरमधील एका खोलीत एकत्र राहत होते. 23 जुलै 2024 रोजी रात्री उशिरा दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात चेतनने शांतीक्रियाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.
आणखी वाचा