अकोला : एकीकडे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून नेतेमंडळी व कार्यकर्ते आमने-सामने येत आहेत. त्यातच, अकोल्यात मे 2023 मध्ये दंगल झालेल्या हरिहरपेठ भागात पुन्हा दोन गटात तणाव निर्माण झाला आहे. या तणावावरुन अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती असून मोठा जमाव रस्त्यावर उतरल्याचंही दिसून आलं. या घटनेनंतर तात्काळ घटनास्थळावर मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला आहे. पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आणली जात आहे.
हरिहरपेठ भागात गाडगे महाराजांचा पुतळा आहे, त्या परिसरात ही दगडफेक आणि जाळपोळ सुरू आहे. दोन गटात शुल्लक कारणावरून तणाव निर्माण झाला असल्याची प्राथमिक माहिती असून पोलिस व सुरक्षा फोर्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुरक्षा जवानांच्या पथकांकडून जमावाला पांगवण्यात येत आहे.
दरम्यान, अकोल्यातील हरिहर पेठ भागात झालेली दगडफेक आणि जाळपोळ अकोला पोलिसांचं अपयश आहे. पोलिसांची गुप्तचर यंत्रणा कुचकामी असून यासंदर्भात गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले.
हेही वाचा
Video : फडणवीसांची रावडीस्टाईल… ”देवाभाऊ जो बोलता है वो करता है, जो नही बोलता वो डेफिनेटली करता है”
अधिक पाहा..