अकोला: अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातल्या बुब पेट्रोलपंप येथे एका सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान दोन जणांकडून ही जबर मारहाण झाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या मारहाणीचे मूळं कारण समोर आलं नाही. मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावाचे सरपंच प्रदीप फुके हे दैनंदिन कामे आटपून गावी जात होते, वाटेतच पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबले. त्याचवेळी रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून हा वाद झाला आणि या वादादरम्यान सरपंच फुके यांना 2 व्यक्तींनी मारहाण केली. हा मारहाणीचा प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकरणात मुर्तीजापुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात एका सरपंचाला पेट्रोलपंपावर बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निंबा गावाचे सरपंच प्रदीप फुके यांना दोन व्यक्तींनी मारहाण केली असून, हा प्रकार पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच फुके दैनंदिन कामे आटपून गावी जात असताना पेट्रोल भरण्यासाठी मूर्तिजापूर येथील बुब पेट्रोलपंपावर थांबले. त्यावेळी रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून त्यांचा दोन व्यक्तींशी वाद झाला. यावेळी दोघांनी मिळून सरपंच फुके यांना बेदम मारहाण केली.
या घटनेचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घटनेनंतर सरपंच फुके यांनी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
आणखी वाचा