Achalpur Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभेत भाजप आणि महायुतीला विदर्भात दारुण पराभवाला समोर जावे लागले होते.  दरम्यान आज  (शनिवारी) सकाळी आठ वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच महायुतीला (Mahayuti) बहुतांश ठिकाणी प्रचंड मोठे यश मिळताना दिसत आहे. दरम्यान, राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या अचलपूर विधानसभा मतदारसंघातून एक धक्कादायक बातमी समोर आली. परिवर्तन महाशक्तीचे (Parivartan Mahashakti) घटक असलेले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना परभवाचा जबर धक्का बसला आहे. तर अचलपूर विधानसभेत भाजपचे प्रवीण तायडे यांचा विजय जवळ जवळ निश्चित झाला आहे. 

भाजपचे प्रवीण तायडे यांचा विजय

अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू विरुद्ध भाजपचे प्रवीण तायडे यांच्यासह काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख यांच्यात तिरंगी लढत होती. यात मात्र भाजपचे प्रवीण तायडे यांनी  विजय संपादन करत मोठे यश आपल्या परड्यात खेचून आणले आहे. तर अमरावती विधानभेतून अखेर महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुलभा खोडके 2258 मतांनी विजयी झाला आहे. 

सरकार स्थापनेच्या तयारीत असलेल्या बच्चू कडूंचा पराभव

कोणत्याही पक्षाजवळ बहुमत राहणार नाही, मात्र अमच्याशिवाय सरकार बसणार नाही, असा दावा बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केला होता.  यावेळी आर्वी येथे जयकुमार बेलखडे या प्रहारच्या उमेदवारासाठी आर्वी येथे सभा घेण्यात आली होती. यावेळी बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाले असून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही 122 जागा उभ्या केल्या, त्यात 40 जागा प्रहारच्या आहे. त्यातल्या त्यात प्रहार 10-15 जागावर दणका ठेवणार आहे. त्यात आर्वीचा समावेश असल्याचंही ते म्हणाले होते. तर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना महाविकास आघाडी आणि महायुती सोबत येण्यासंदर्भात फोन आल्याची माहिती पुढे आली होती. बच्चू कडू यांनी स्वत: फोनद्वारे या बाबत माहिती दिली होती. त्यामुळे सरकार स्थापनेच्या तयारीत असलेल्या बच्चू कडूंचा पराभव झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

 

अधिक पाहा..



Source link