राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला आता वेग आला असून, या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल 28 फेब्रुवारीपूर्वी सादर होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, कोणत्याही विमान अपघाताचा चौकशी अहवाल महिनाभरात सादर करणे बंधनकारक असते, त्या दृष्टीने तपास यंत्रणांनी आपली कार्यवाही पूर्ण केली आहे. डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधून मिळणार महत्त्वाचे पुरावे. तपास पथकाने विमानाच्या डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर (DFDR) मधील माहिती यशस्वीरीत्या डाऊनलोड केली आहे. या डेटाच्या विश्लेषणामुळे अपघाताच्या वेळी नेमकी काय स्थिती होती, हे स्पष्ट होणार आहे.

Add Zee News as a Preferred Source

अहवालात नेमके कोणते मुद्दे स्पष्ट होणार?

दृश्यमानता (Visibility): लँडिंगच्या वेळी हवामान कसे होते आणि वैमानिकाला धावपट्टी स्पष्ट दिसत होती का?
विमानाची उंची (Altitude): विमान कोसळण्यापूर्वी आणि अपघाताच्या नेमक्या क्षणी ते किती उंचीवर उडत होते?
तांत्रिक स्थिती: विमानाची गती आणि इंजिनची स्थिती कशी होती?

कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरला (CVR) उष्णतेची झळ

तपासादरम्यान एक अडथळा समोर आला असून, विमानाच्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरला (CVR) आगीमुळे किंवा तीव्र उष्णतेमुळे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सीव्हीआरमध्ये वैमानिकांच्या संभाषणाची नोंद असते. आता तांत्रिक तज्ज्ञ यातून काही माहिती पुनर्प्राप्त (Recover) करता येईल का, याचा प्रयत्न करत आहेत.

महिनाभरात अहवाल येणे अपेक्षित

विमान अपघाताच्या चौकशीसाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, घटनेच्या ३० दिवसांच्या आत प्राथमिक माहिती समोर येणे आवश्यक असते. या अपघाताला आता काही दिवस उलटले असून, २८ फेब्रुवारीपर्यंत चौकशी समिती आपला पहिला अधिकृत अहवाल सरकारला सादर करेल. या अहवालामुळे अजित पवारांच्या विमानाला झालेला अपघात हा तांत्रिक बिघाडामुळे होता की मानवी चुकीमुळे, यावरील पडदा उठण्याची शक्यता आहे.

 जय पवार यांची भूमिका

अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी 18 फेब्रुवारी 2026 रोजी सोशल मीडियाच्या (इन्स्टाग्राम स्टोरी) माध्यमातून प्रथमच आपली भूमिका मांडली आहे. ब्लॅक बॉक्सबाबत शंका वर्तवण्यात आली आहे विमाचा ‘ब्लॅक बॉक्स’ (Black Box) विमान अपघातात इतक्या सहजपणे नष्ट होऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पारदर्शक तपासाची मागणी जय पवार यांनी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेला या भीषण दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच VSR व्हेंचर्सवर कारवाईची मागणी केली आहे. ज्या कंपनीचे (VSR Ventures) हे विमान होते, त्या कंपनीच्या उड्डाणांवर तात्काळ बंदी घालण्याची आणि त्यांच्या विमानांच्या देखभालीतील संभाव्य गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

रोहित पवारांचे आरोप 

रोहित पवार यांनी या अपघाताबाबत सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. घातपाताची शंका व्यक्त केली आहे.  हा केवळ अपघात नसून वैमानिकाचा वापर करून घडवून आणलेला ‘घातपात’ असू शकतो, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. तपासातील दिरंगाई: अपघाताला २० दिवस उलटूनही प्राथमिक अहवाल का आला नाही? असा सवाल त्यांनी केला असून तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप केला आहे. विमानाचा मॉडेल नंबर चुकीचा नोंदवणे, वैमानिकाची शेवटच्या क्षणी झालेली बदललेली नियुक्ती आणि विमानातील अतिरिक्त इंधन यांसारखे मुद्दे त्यांनी समोर आणले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आंतरराष्ट्रीय एजन्सी आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी व पवार कुटुंबातील सदस्य यांचा समावेश असलेली समिती स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp