अकोला :  मानसिक वेदना, आणि सततच्या छळाला कंटाळून अकोल्यातील एका पत्नीने (Akola Crime News) थेट नवऱ्याला संपवल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या धक्कादायक हत्येच्या कटात तिचा अल्पवयीन मुलगाही सहभागी होता. सुरुवातीला अपघात असल्याचा बनाव रचण्यात आला होता, मात्र तब्बल 26 दिवसांच्या तपासानंतर जुने शहर पोलिसांनी हा खून उघडकीस आणला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. (Akola Crime News)

पतीची ओळख – रमेश सातरोटे (वय 52)
पत्नी आणि संशयित मारेकरी – शिला रमेश सातरोटे (वय 42)
घटना स्थळ – अंबिका नगर, जुने शहर पोलीस स्टेशन हद्द

अपघाताचं रुपांतर खुनात; असा आहे घटनाक्रम

30 एप्रिल 2025 रोजी पोलिसांत दाखल झालेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे, रमेश सातरोटे यांचा मृत्यू दारूच्या नशेत पडून झाल्याचे पत्नीने सांगितले होते. मात्र शवविच्छेदनासाठी पत्नीचा विरोध आणि नातेवाईकांचा संशय यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. वैद्यकीय अहवालात मृत्यू ‘प्राकृतिक’ नसून ‘बलप्रयोगामुळे’ झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांची चक्र वेगात फिरली आणि अखेर 26 दिवसांनंतर खऱ्या घटनांची उलघड झाली.

आरोपीकडून हत्येची कबुली 

पोलिसांनी शंका घेऊन शिला सातरोटे आणि तिचा अल्पवयीन मुलगा यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. घटनेच्या दिवशी रमेश दारू पिऊन पत्नीला मारहाण करत होता. सततच्या त्रासाला कंटाळून मुलाने फावड्याने वडिलांवर वार केला आणि आईनेही त्याला मारहाण केली. यातच रमेशचा मृत्यू झाला.

तपास आणि पुढील कारवाई

जुने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण, वैद्यकीय अहवाल, आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हा उघडकीस आणला. अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले असून, शिला सातरोटेला अकोला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तिची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे.  या घटनेमधून पुन्हा एकदा स्पष्ट होतं. घर म्हणजे सुरक्षिततेचं स्थान असायला हवं, छळाचं नव्हे. अन्यथा, जेव्हा मूक वेदना स्फोट होतात, तेव्हा त्यात केवळ माणूसच नाही, तर मूल्ये देखील संपतात. 

लग्नापूर्वीच्या प्रियकराशी प्रेमसंबंध; मुंबईत पतील संपवलं

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  मुंबईच्या (Mumbai Crime News) ॲण्टाॅप हिल परिसरातील बंगाली पुरा, राजीव गांधी झोपडपट्टी येथे ही घटना घडली आहे. या हल्यात इस्माइल अली शेख याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी प्रियकर सकलाईन गोलम किब्रिया शेख याला पोलिसांनी (Mumbai Crime News) अटक केली आहे. तर पत्नी सुमय्या ईस्माइल शेख ही सध्या फरार आहे. प्रियकर सकलाईन आणि सुमय्या या दोघांमध्ये लग्नापूर्वीपासून प्रेमसंबध होते.(Mumbai Crime News) 

मात्र, सुमय्याचा विवाह हा इस्माइलसोबत लावून दिला, मात्र दोघांमध्ये तिच्या लग्नानंतरही  प्रेमप्रकरण सुरू होते. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या इस्माइलचा काटा काढण्याचा कट दोघांनी रचला. यातून सोमवारी सकलाईन याने चाकूने इस्मालवर वार करून त्याची हत्या केली आहे. या प्रकरणी ॲण्टाॅप हिल पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.

अधिक पाहा..



Source link