Amol Mitkari 5 Questions over Ajit Pawar Plane Crash in Baramati: अजित पवार यांचं बारामतीमध्ये विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याने एकीकडे हळहळ व्यक्त केली जात असताना, दुसरीकडे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही आहेत. अजित पवारांच्या अकाली निधनाने अमोल मिटकरींना प्रचंड मोठा धक्का बसला असून ते अक्षरश: कोलमडले आहेत. यादरम्यान त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काही प्रश्न विचारत त्यांची उत्तरं मागितली आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? अशी विचारणा करत अमोल मिटकरी यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.  एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???  एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? असेही प्रश्न त्यांनी विचारले आहेत. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही. मात्र हे प्रश्न माझं मन विचारत आहे असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही असंही त्यांनी अखेरीस स्पष्ट केलं आहे. 

अमोल मिटकरींची पोस्ट जशीच्या तशी

आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले. त्यातील पहिली खुर्ची – सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची. आणि दुसरी – आदरणीय दादांची!!

मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे.

प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही.
मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय—

• अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?
• सहावी व्यक्ती कुठे गेली?
• Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?
• एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???
• एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?

प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही.

‘Learjet 45 विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली?’

यानंतर त्यांनी अजून एक पोस्ट शेअऱ केली असून त्यात लिहिलं आहे की, “उपमुख्यमंत्रीसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी अपघात व सुरक्षा दोषांचा इतिहास असलेल्या Learjet 45 विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली? तसेच अहवालांनुसार पूर्वी अल्कोहोल-संबंधित कारणांवर शासकीय कारवाई/निलंबनाची नोंद असलेल्या पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने आणि कोणत्या मेडिकल-फिटनेस, CRM व सेफ्टी क्लिअरन्सवर करण्यात आली—याबाबत सविस्तर तांत्रिक स्पष्टीकरण काय?”

जय पवार खासदार होणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांच्याबाबत भाजपा अनुकूल नाही. मात्र जय पवार यांच्या नावावर सहमती आहे. त्यामुळे जय पवार यांना राज्यसभा खासदार केलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे मुंबईत पक्ष कार्यालयात पार्थ पवार दाखल झाले आहेत

प्रफुल्ल पटेल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पियुष गोयल यांचा दावा

यादरम्यान प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे असा दावा भाजपा नेते पियुष गोयल यांनी केला आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp