Amravati Crime News : अमरावतीतील महिला पोलीस हत्या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली असून महिला पोलीस अमलदाराच्या मृत्यू प्रकरणी तिचा पती राहुल तायडे याला पोलिसांनी अटक (Crime News) केली आहे. पोलिसांनी रात्रीच पतीला ताब्यात घेतलं असून पती राहुल तायडे हाच आपल्या पत्नीच्या हत्येप्रकरणी कारणीभूत असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान या प्रकरणी मृतक महिला पोलीस अंमलदाराच्या बहिणीच्या तक्रारीवरून पती राहुल तायडे याची पोलिसांकडून (Crime) चौकशी सध्या सुरू आहे.

गळ्यावर व्रण, पोलीस पतीला अटक, नेमकं प्रकरण काय?

पुढे आलेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनीत काल (1ऑगस्ट ) राहत्या घरीच महिला पोलीस अंमलदाराची हत्या झाली होती. आशा धुळे (तायडे) वय 38 वर्ष असे या मृतक पोलीस अंमलदाराच नाव आहे. मात्र हि हत्या नेमकी का? आणि कुठल्या कारणातून झाली हे अद्याप कळू शकलेले नाही. अशातच आज (2 ऑगस्ट) महिला पोलीस अंमलदाराचं शवविच्छेदन केल्यानंतर शविच्छेदन (पोस्टमार्टम) अहवाल आल्यानंतर मृत्यूच कारन समोर येणार आहे. मात्र त्यापूर्वी संशयाची सुई पतीकडे वळल्याने पोलिसांनी रात्रीच पतीला अटक केली आहे.

विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पती देखील राज्य राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. हत्या झालेली महिला फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होती. महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. डीसीपी गणेश शिंदेंसह वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनने परिसरासह पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

शेतातून पाईप टाकण्याच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये पोलिसांसमोरच जोरदार हाणामारी

शेतातून पाईप टाकण्याच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये पोलिसांसमोरच जोरदार हाणामारी झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सध्या या हाणामारीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. चिमूर तालुक्यातील महादवाडी येथील ही घटना असून भागडे चुलत बंधूंमध्ये शेतातून पाईप टाकण्यावरून वाद आहे. याबाबत पोलिसात तक्रार देखील देण्यात आली होती आणि त्यानुसार पोलीस हा वाद सोडवण्यासाठी गावात पोहोचले. मात्र पोलिसांसमोरच या दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाली. पोलिसांनी दोन्ही पक्षांवर गुन्हा दाखल केलाय.

हे ही वाचा 

आणखी वाचा



Source link