Ayodhya Ram Mandir: अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना येत्या 22 जानेवारीला होणार आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील रामभक्त आपली सेवा प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आशातच अंबानगरी  अमरावतीची(Amravati) खास ओळख असलेले  500 किलो कुंकवाचा करंडा अयोध्येत पाठवण्याचा संकल्प आमरावतीच्या सकल हिंदू समाजने केला आहे. कौंडण्यपूर येथील रुक्मिणी पीठाचे पीठाधीश्वर श्री राजराजेश्वर माउली सरकार हे त्यांच्यासोबत प्रतीकात्मक कलशात कुंकू सोबत नेतील. तसेच उर्वरित कुंकू रुक्मिणी पीठाचे सेवक अयोध्येला घेऊन जाणार आहेत.

अंबानगरीच्या कुंकूची खास ओळख

अयोध्येत भव्य राम मंदिरात रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याला काल, 16 जानेवारी पासून सुरुवात झाली. काल प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीची पूजा झाली. त्यानंतर 18 जानेवारीला गाभाऱ्यात रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तर येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. या निमित्याने जगभरातील रामभक्तांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अशातच अमरावतीच्या सकल हिंदू समाजने 500 किलो कुंकू अयोध्येत पाठवण्याचा संकल्प केला आहे. श्री राजराजेश्वर माउली यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने 17 जानेवारीला अमरावतीत कुंकू अर्पण सोहळा आयोजित करण्यात आला.

कुंकू तयार करणारे शहर म्हणून अमरावतीची खास ओळख आहे. हळदीबरोबर चिंचोका, रताळ्याची पावडर, टोपिओका, डोलामॅट यांपासून कुंकू बनवले जाते. अमरावतीत आता कुंकू तयार करणारे कारखाने बोटावर मोजण्‍याइतके शिल्‍लक असले, तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत येथील कुंकवाला मोठी मागणी होती. त्यामुळे अमरावतीचे हे खास कुंकू प्रभूश्रीराम मंदिराच्या हा सोहळ्यासाठी पाठवण्याचा आमचा मानस असल्याचे केसरी धर्मसभेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता म्हणाले. 

22 जानेवारीला अनेक शुभ योग

ज्योतिषांच्या मते, 22 जानेवारीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी अभिजीत मुहूर्त, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवि योग असे तीन शुभ योग तयार होत आहेत. कोणताही शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या योगांमध्ये कोणतेही काम केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या कामात यश मिळते.

म्हणून झाली 22 जानेवारीची निवड

धार्मिक मान्यतेनुसार, भगवान रामाचा जन्म अभिजीत मुहूर्तावर मृगशीर्ष नक्षत्र, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योगाच्या संयोगादरम्यान झाला. हे सारे शुभ योग 22 जानेवारी 2024 रोजी पुन्हा एकदा जुळून आले आहेत. त्यामुळेच अयोध्येमध्ये राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 22 जानेवारीची निवड करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

 

अधिक पाहा..



Source link