Viral Video: जर एखादा बिबट्या आणि कुत्रा एकमेकांच्या समोर आले तर काय होईल असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? नक्कीच तुमचं उत्तर बिबट्या असेल. पण जर तुम्हाला एखाद्याने कुत्रा जिंकेल असं सांगितलं तर नक्कीच त्याला वेड्यात काढाल. पण नाशिकमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. एका कुत्र्याने फक्त बिबट्याला पराभूत केलं नाही, तर त्याला चक्क फरफटत नेलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एका भटक्या कुत्र्यामध्ये आणि बिबट्यामध्ये सामना झाला. यावेळी कुत्र्याने फक्त बिबट्याला पराभूत केलं नाही, तर त्याला 300 मीटर ओढत नेलं. नाशिकमधील निफाडमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या दिलेल्या माहितीनुसार, ही घटना या आठवड्याच्या सुरुवातीला घडली जेव्हा बिबट्या परिसरात घुसला होत. कुत्र्याने आक्रमक प्रतिहल्ला केला, बिबट्याला पकडलं आणि बराच अंतरापर्यंत ओढत नेलं.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कुत्र्याच्या अचानक झालेल्या हल्ल्याला तोंड न देता बिबट्याने अखेर स्वतःची सुटका करून घेतली आणि पळून गेला. विशेष म्हणजे संघर्ष करणारा कुत्रा यातून वाचला आहे. परिसरातील कोणत्याही नागरिकाला दुखापत झालेली नाही.
स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जखमी झाल्यानंतर बिबट्या जवळच्या शेतात पळून गेला होता. वन अधिकाऱ्यांनी अद्याप बिबट्याला वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे की नाही याची पुष्टी केलेली नाही. परंतु घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थ आणि पाळीव प्राणी सुरक्षित नसल्याचं नमूद केलं आहे.
नाशिकमधील ही घटना तेव्हा घडली आहे, जेव्हा देशात भटक्या कुत्र्यांसंदर्भात चर्चा रंगली आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठाने दिल्ली-एनसीआरमध्ये लसीकरण केलेल्या भटक्या कुत्र्यांना सोडण्यास मनाई करणाऱ्या आपल्या पूर्वीच्या निर्देशात सुधारणा केली आणि या निर्बंधाला “खूप कठोर” म्हटलं आहे.