Ashok Kharat Connection With Ajit Pawar Plane Crash: नाशिकमधील भोंदू ज्योतिषी अशोक खरातसंदर्भात नवीन नवीन माहिती समोर येत असतानाच आता या भोंदू बाबाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताशी काही संबंध आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे केवळ अजित पवारांच्या पक्षाचे आमदार असलेल्या अमोल मिटकरींकडूनच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मिटकरींनी व्यक्त केली शंका

अमोल मिटकरींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांचा विमान अपघात आणि खरात करत असलेल्या जादूटोण्याचा काही संबंध आहे का? याची चौकशी केली पाहिदे असं म्हटलं आहे. “अघोरी पूजा आणि अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा संबंध नाकारता येत नाही,” असं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हंटलं आहे. अजित पवारांच्या बंगल्याबाहेर टाकलेल्या उता-याबाबत रूपाली ठोंबरे-पाटील यांनी व्यक्त केलेल्या शंकेला अमोल मिटकरी यांनी दुजोरा दिला आहे. हा संशय गांभीर्यानं घेण्याची गरज असल्याचं मिटकरी म्हणाले. तसंच, “महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू असताना असा प्रकार घडल्याबद्दल कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी मिटकरींनी केली आहे.

काही लोकांना अजित पवार नकोसे झाले होते का?

तसेच, “काही लोकांना अजित पवार नकोसे झाले होते का? यामागचा मास्टरमाइंड कोण? अशोक खरातचे व्हीएसआर विमान कंपनीच्या व्ही. के. सिंग यांच्याशी संबंध आहेत का? या सर्व गोष्टींचा एसआयटी तपासातून खुलासा झाला पाहिजे,” अशी मागणीही मिटकरी यांनी केली. 

शरद पवारांच्या पक्षालाही शंका

शरद पवारांच्या पक्षानेही यासंदर्भातील शंका उपस्थित केली आहे. शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रवक्ते सुनील माने यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन व्हिडीओ पोस्ट करत खरात आणि अजित पवारांच्या विमान अपघाताचं काही कनेक्शन आहे का? अशी शंका उपस्थित केली आहे. “अजितदादा पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्याबाहेर आणि बारामतीतील बंगल्याबाहेर जादूटोण्यातील वस्तू सापडल्या होत्या. हे कृत्य भोंदू बाबा कॅप्टन खरात आणि त्याच्याशी संबंधीत व्यक्ती करत होत्या काय? याची चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा आहे. त्यानुसारही या प्रकरणात गुन्हा दाखल केला पाहिजे,” असं माने यांनी म्हटलं आहे.

रुपाली ठोंबरेंचा रुपाली चाकणकरांवर निशाणा अन् चौकशीची मागणी

गुरुवारी रुपाली ठोंबरेंनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणामध्ये आपल्याच पक्षाच्या महिला नेत्या आणि महाराष्ट्रातील महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपला चाकणकरांवर निशाणा साधला आहे.  “रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राहिल्यास अशोक खरात प्रकरणाचा तपास व्यवस्थित होणार नाही. तसेच, चाकणकर 100 टक्के पुरावे नष्ट करतील,” अशी शक्यता ठोबरेंनी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर ठोंबरेंनी चाकणकर यांना सह-आरोपी करण्याची आणि तात्काळ त्यांचा राजीनामा देण्याची मागणी देखील केली. “महिला आयोगाच्या अध्यक्षांचे असलेले पाठबळ यामुळेच अशोक खरात या भोंदू बाबाची हिम्मत वाढली. चाकणकर यांनीच खरातला अभय दिले,” असं ठोंबरे म्हणाल्या. अजित पवारांच्या देवगिरी आणि बारामती बंगल्याबाहेर सापडलेल्या जादूटोण्याच्या वस्तू आणि उतारा यांचा खरातशी संबंध असू शकतो का याची चौकशी करण्याची मागणी ठोंबरेंनी केली आहे. 

“आज अजित पवार असते तर रूपाली चाकणकर यांना तात्काळ पदावरून हटवले असते. त्यांनी चाकणकरांना याआधीच राजीनामा देण्यास सांगितले असते. कारण त्यांनी आजवर अनेकदा कर्तव्यात कसूर केलेली आहे,” असंही ठोंबरे म्हणाल्या.

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp