Trupti Desai on Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत असून, सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी धक्कादायक दावा केला आहे. तृप्ती देसाई यांच्या दाव्याने एकच खळबळ माजली आहे. अशोक खरातने शरद पवारांच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. याआधी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्या फोटोवर अशोक खरातने फुल्या मारल्याचा दावा केला होता. यावेळी त्यांनी आणखी एका नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्याचं सांगताना नाव घेणं टाळलं होतं.
अजित पवार यांच्या फोटोला फुल्या मारल्या होत्या. दुसऱ्या आणखी एका मोठ्या नेत्याच्या फोटोला फुल्या मारल्या. मला वाटतं तो बडा नेता शरद पवार असावेत. कारण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ नये असं अनेक लोकांना वाटत होतं असं तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
“होय, अशोक खरात प्रकरण वर्षभरापूर्वीच माझ्याकडे आलं होतं. पण त्यावेळी माझ्याकडे पुरावे नसल्याने मी पत्रकार परिषद घेऊ शकले नाही. याचा अर्थ मी या प्रकरणात सेटलमेंट केली होती असं कुठेही सिद्ध होत नाही,” असा खुलासा तृप्ती देसाई यांनी केला आहे. आताही मी हे प्रकरण रोज लावून धरतंच आहे. तसंच निलम गोऱ्हे यांच्यावरील आरोपांवर मी आजही ठाम असून योग्यवेळी पुरावे सादर करेन, असा दावा देसाई यांनी केला आहे.
“अशोक खरातचे अनेक कारनामे समोर येत आहेत. यापूर्वी आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांनी त्याला पाठीशी घातला. 11 जून 2022 ला विकास रामदास दिवटे (37) या युवकाने खरातच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. अशोक खरातने ज्या धमक्या दिल्या त्याचे कॉल रेकॉर्ड देखील होते. राजेंद्र दिवटे यांनी गुन्हा दाखल केला. शिर्डी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल कारण्यात आलाय अशोक खरातला अटक करण्यात आली नाही. खरातच्या त्यावेळी सुवर्ण काळ होता,” असं त्या म्हणाल्या.
पुढे त्यांनी म्हटलं की, चार्जशीट मधून अशोक खरातच नाव पोलिसांनी गायब केलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पोलिसांनी ही माहिती एकनाथ शिंदे यांना दिली नाही. विकास दिवटेचे कुटुंब गरीब आहे ते काही करू शकत नाही त्यामुळे खरातवर कारवाई झाली नाही.
विकास दिवटे मयत व्यक्ती आहे त्याच्या सासरचे लोक खरातकडे जात होते. सुसाईड नोटमध्ये सासरचे 3 लोक आणि खरातचं नाव असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दीपक केसरकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खरातकडे घेऊन गेले असावेत असंही त्यांनी म्हटलं.
निलम गोऱ्हे यांच्यासंदर्भात ते म्हणाले की, “2 वेळा नीलम गोऱ्हे खरातला भेटायला गेल्या होत्या त्यावर मी ठाम आहे. शिवसेना शिंदे गटातील लोकांनी मला नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील पुरावे दिले आहेत. नाशिक आणि पुण्यातील नेत्यांनी मला माहिती दिली आहे.
योग्य वेळ येईल तेव्हा सत्य समोर येईल. निलम गोरे अशोक खरातला भेटल्या तेव्हा ते व्यक्ती सोबत होते.. नीलम गोऱ्हे खोट बोलत आहेत, खरातला त्या भेटल्या आहेत. हात दाखवण्यासाठी आणि भविष्य विचारण्यासाठी त्या अशोक खरातकडे गेल्या होत्या”.