अकोला : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाकेंमधील वाद थांबवण्याचं नाव घेत नाही. अमोल मिटकरींनी ट्वीट करत हाकेंवर टीकेचा आसूड ओढला. विधानसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केली असा आरोप त्यांनी केला. अशोक चव्हाणांच्या मुलीला निवडून आणण्यासाठी लक्ष्मण हाकेंनी तोडपाणी केलं आणि दबाव टाकून ओबीसी उमेदवार मागे घ्यायला लावा असा आरोपही केला. मिटकरींनी त्यासंबंधी एक ऑडिओ क्लीप शेअर केली. एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

Amol Mitkari Tweet On Laxman Hake : काय म्हटलंय मिटकरींनी? 

अमोल मिटकरींनी त्यांच्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप शेअर करत म्हटलंय की, “सदर ऑडिओ ही भोकर मतदारसंघातील आहे. याच मतदारसंघात एका OBC बांधवाचा राजकीय बळी देऊन हाक्याने आर्थिक देवाण-घेवाण केली आणि अर्ज मागे घ्यायला भाग पाडले. आता या मतदारसंघात आर्थिक तडजोड किती मोठी झाली असेल हे सुज्ञास सांगणे न लगे”.

 

Amol Mitkari Vs Laxman Hake : काय आहे नेमकं प्रकरण? 

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत नामदेव आईलवाड नावाच्या उमेदवाराने प्रहार पक्षाकडून भोकर विधानसभेसाठी अर्ज भरला होता. पण शेवटच्या दिवशी त्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्यासाठी लक्ष्मण हाकेंचा दबाव होता असं तो म्हणाल्याचं एका ऑडिओ क्लिपमधून ऐकू येतं. या मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर अशोक चव्हाण यांच्या कन्या सुजया चव्हाण निवडून आल्या आहेत. 

Amol Mitkari Audio Clip : ती क्लिप खरी, प्रहारच्या शेखर कुंटे यांचा दावा

अमोल मिटकरींनी ट्वीट केलेली ऑडिओ क्लिप आपलीच असल्याचं भोकरमधील प्रहारचे तालुकाध्यक्ष शेखर कुंटे यांनी स्पष्ट केलं. भाजपनं आर्थिक तडजोड करून भोकरचा उमेदवार फोडला असा दावा त्यांनी केला. तर या सगळ्या प्रकरणात लक्ष्मण हाके यांनी तोडपाणी करत ओबीसीचे उमेदवार पाडले असा आरोपही त्यांनी केला. 

Prahar Shaikhar Kunte : शेखर कुंटेंचे लक्ष्मण हाकेंवर आरोप काय? 

अमोल मिटकरींनी केलेल्या दाव्यावर बोलताना शेखर कुंटे म्हणाले की, नामदेव आईलवाड यांनी शेवटच्या दिवशी, 4 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेतला. आपल्याशी कोणतीही चर्चा न करता त्यांनी अर्ज माघार घेतला. त्यावर विचारले असता त्यांच्यावर लक्ष्मण हाकेंचा दबाव असल्याची माहिती दिली. नंतर तोच उमेदवार 7 नोव्हेंबर रोजी लक्ष्मण हाकेंच्या गाडीतून लोहा मतदारसंघात फिरत होता. 12 नोव्हेंबर रोजी पंकजा मुंडे यांनी भोकरमध्ये सभा घेतली. त्यामध्ये आईलवाड हा स्टेजवर होता. नंतरच्या काळात तो सातत्याने लक्ष्मण हाकेसोबत दिसला. त्यामुळे लक्ष्मण हाकेंनी ओबीसी उमेदवार उभे करुन तोडपाणी केल्याचं स्पष्ट आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..





Source link