Ahmedabad Plane Crash Maharashtra Victim: अहमदाबाद विमान दुर्घटनेत 240 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, यामध्ये महाराष्ट्रातील एकूण सहा जणांनी जीव गमावला आहे. हे सहा जण अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानातून प्रवास करत होते. यामध्ये तीन क्रू मेम्बर आणि एक पायलट तसंच एक दाम्पत्य आहे. त्यांची नावं दीपक पाठक (बदलापूर), अपर्णा महाडिक (गोरेगाव), सुमित सभरवाल (पवई), महादेव पवार (सोलापूर), आशा पवार (सोलापूर), रोशनी सोनघरे (डोबिंवली) आणि मैथिली पाटील (नवी मुंबई) अशी आहेत.

1) दीपक पाठक 

दीपक पाठक हे गेल्या पंधरा वर्षांपासून एअर इंडिया नोकरीला होता. त्यांचं कुटुंब कात्रज भागातील रावल कॉम्प्लेक्स मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे. आज सकाळीच टेकऑफ करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियात अपडेट केलं होतं. 

2) अपर्णा महाडीक

चिपळूण तालुक्यातील धामेली (भोजनेवाडी) गावातील सुनबाई आणि एअर इंडिया या प्रतिष्ठित विमान कंपनीमध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेल्या अपर्णा महाडिक (35) यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघाताने कोकणच्या मातीतून आकाशात झेपावलेली एक जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ कन्या हरपली आहे. 

अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या एअर इंडिया सेवेत कार्यरत होत्या. 

3) सुमित सभरवाल

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील को-पायलट सुमित सबरवाल याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईतील पवई परिसरामध्ये सुमित सबरवाल याचे 88 वर्षाचे वडील एकटेच राहतात. टेकऑफ करण्यापूर्वी सुमितने त्यांच्याशी संवाद साधला होता. लंडनमध्ये विमान लँड झाल्यावर मी पुन्हा बोलेन असं त्याने सांगितलं होतं. पण त्या आधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. सुमितच्या पश्चात त्याची बहीण आणि दोन भाचे असा परिवार आहे. 

4) महादेव पवार आणि आशा पवार 

मूळचे सांगोला तालुक्यातील हातिद गावातील पवार दांपत्याचा विमान अपघातात समावेश आहे. महादेव पवार ( वय ६७) आशा पवार ( वय ५५) यांनी त्यांचा जीव गमावला आहे. लंडनमध्ये त्यांचा मुलगा व्यावसायिक आहे. त्याच्याकडे जाण्यासाठी विमानाने प्रवास करत होते. त्यांचा दुसरा मुलगा अहमदाबाद येथे व्यवसाय करत आहे.

5) रोशनी सोनघरे

अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटी मध्ये आपल्या आई-वडिल आणि भावासोबत राहत होती. तिचे वडील राजेंद्र, आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते . मुंबई ग्रँड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झालं होतं. 

रोशनी हिचा भाऊ विघ्नेश हा एका खासगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो तर आई-वडील हे घरीच असतात. रोशनीचे शिक्षण मुंबईत झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे व त्यांचे पत्नी राजश्री हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवले. रोशनीला लहानपणापासूनच एअर क्रू बनायचं होतं. तिने जिद्द आणि मेहनत करत तिचे स्वप्न पूर्ण केलं. काल आई-वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या फ्लाईटने ते लंडनच्या दिशेने निघाली होती. मात्र याच विमानाचा अपघात झाला व रोषणाईचा दुर्दैवी मृत्यू झालाय..

6) क्लाईव्ह कुंदर 

क्लाईव्ह कुंदर पायलट इन कमांड सुमित सभरवाल सह-पायलट होता. मुंबईतील पश्चिम उपनगरात तो वास्तव्यास होता.





Source link