Amravati News अमरावती : अमरावती लोकसभेत  (Loksabha Election 2024) ज्यांना पराभव पत्करावा लागला त्यांना हार पचवता आली नाही. राज्यात शिव-शाहू फुले, आंबेडकर विचारधारा आहे. मात्र काही लोक घाण राजकारण करत आहेत. आम्ही गांधी विचाराने पुढे जाणारी लोक आहोत. मात्र गरज पडल्यास त्यांना योग्य उत्तर देखील देऊ शकतो. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्री यांना मी विनंती केली आहे की हे आता थांबले पाहिजे. आमचा विजय त्यांच्या पचनी पडला नाही. म्हणूनच त्यांनी आमच्या विजयाचे बॅनर फाडले आहेत. ही संस्कृती कुणाची आहे आणि या मागे कुणाचा हात आहे हे अमरावती मधील लोकांनां चांगल्याने माहीत आहे. अशा शब्दात अमरावतीत काँग्रेसच्या खासदार बळवंत वानखेडे यांचे बॅनर फडल्या प्रकरणी निषेध करत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

आमचा विजय त्यांना पचनी पडला नाही – यशोमती ठाकूर 

अमरावतीच्या राजकमल चौकात काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे फ्लेक्स फाडल्याचा प्रकार समोर आलाय. या संपूर्ण प्रकाराबद्दल काँग्रेसने संताप व्यक्त केलाय. ही घटना रविवारच्या सायंकाळी घडली. या प्रकरणी आज काँग्रेसकडून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली असून बॅनर फाडणाऱ्याला तात्काळ कारवाई करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच कारवाई होत नाही तोपर्यंत सिटी कोतवाली ठाण्यात काँग्रेस शहराध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं.

परिणामी पोलिसांनी कारवाई करत 20 ते 25 जणाविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. तर आतापर्यंत 4 जणांना अटक केली असून इतरांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. या प्रकरणी आता  काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर या देखील आक्रमक झाल्या असून त्यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केली आहे. 

अमोल मिटकरी यांनी आधी त्यांच्या पक्षाचं पहावं

रोहित पवार (Rohit Pawar) हे माझ्या लायकीचे नेते नाहीत, ते ग्ल्लीबोळातील नेते असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी केलीय. तसेच विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये नाराज असून ते लवकरच भाजप पक्षामध्ये जातील असा दावाही त्यांनी केला. याविषयी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, अमोल मिटकरी यांना विचारून विजय वडेट्टीवार निर्णय घेतील अस वाटत नाही. त्यामुळे ते आजही सोबत आहेत आणि उद्याही सोबत राहतील. अमोल मिटकरी यांनी त्यांच्या पक्षाचं पहावं, आमच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. असे म्हणत अमोल मिटकरींचा दावा यशोमती ठाकूर यांनी फेटाळून लावला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link