बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्ंमहत्या प्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या रिपोर्टमध्ये सीबीआयने सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून, ती आत्महत्याच असल्याचं स्पष्ट केलं आहे. सुशांत प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी तिला अटकही झाली होती. पण सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याने रिया चक्रवर्तीला क्लीन चीट मिळाली असून, तिच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालं आहे. यानंतर झी समूहाचे चेअरमन सुभाष चंद्रा यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीची माफी मागितली आहे. 

माफीनं भूतकाळ बदलणार नाही, भविष्य नक्कीच बदलेल

माध्यमांच्या इतिहासात एक ऐतिहासिक घटना घडली आहे. जवळपास पाच वर्षांनी सुशांत प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीला क्लीन चीट देण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीनेच सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप करण्यात आले होते. रियावर मीडिया ट्रायल सुरु होतं, तेव्हा आम्हीही त्याचा भाग होतो. पण आज जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा झी समूहाचे चेअरमन सुभाष चंद्रा यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. इतका मोठेपमा दाखवण्याचं धाडस यापूर्वी कोणत्याही माध्यमाने केललं नाही. पण सुभाष चंद्रा यांच्यासारख्या व्यक्तीने माफी मागणं हे धाडसाचं पाऊल आहे. आमच्या माफीनं भूतकाळ बदलणार नाही, भविष्य नक्कीच बदलेल असा विश्वास आम्हाला वाटत आहे. 

सुभाष चंद्रा यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

“सुशांत सिंह हत्या प्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. ठोस पुराव्यांअभावी हा रिपोर्ट देण्यात आला असं मी मानतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या संशयाला वाव उरत नाही. त्यामुळेच रियाच्या विरोधात कुणलीही केस उभी राहत नाही. मागे वळून पाहताना मला वाटतं रिया चक्रवर्तीला माध्यमांद्वारे आरोपी ठरवण्यात आलं होतं. झी मीडियाच्या काही संपादकांनी आणि पत्रकारांकडून तिला आरोपी ठरवण्यात आलं होतं. झी न्यूजचा मार्गदर्शक म्हणून मी त्यांना सल्ला देतो की त्यांनी माफी मागण्याचं धाडस दाखवावं. यात माझा कोणताही सहभाग नसतानाही मी रियाची माफी मागतो. मी एकमुखी रुद्राक्षासारखा आहे. बाहेर आणि आतून समान. खऱ्याला नेहमी खरं म्हणतो,” असं सुभाष चंद्रा यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

झी समूहाचे चेअरमन सुभाष चंद्रा यांनी उचललेल्या या पावलाचं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावतं, राजकीय विश्लेषक विजय चोरमारे आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी स्वागत केलं आहे. “माफी मागितली आहे ती चांगली गोष्ट आहे. यामुळे साक्षात्कार होऊन आणि खासकरुन बेछूटपणे बोलणारी व्यक्ती आहे ज्यांनी यात पुढाकार घेतला होता त्यांनी माफी मागायला हवी. हिंदी चॅनेलने अत्यंत भयानक कव्हरेज केलं होतं. रिया चक्रवर्तीला धक्काबुक्कीही झाली होती. ती इतकी त्रासली होती, की मधमाशांप्रमाणे मीडिया तुटून पडलं होतं. तिच्या भावाला परदेशात शिकायला जाता आलं नाही. तिच्या कुटुंबालाही त्रास झाला. तिचं संपूर्ण करिअर जवळपास उद्ध्वस्त झालं. मीडियाने जर अशाप्रकारे पुढाकार घेतला. अटी-शर्थी न घातला केलं तर चांगलं होईल,” असं मत हेमंत देसाई यांनी मांडलं आहे. 

“मीदेखील सुभाष चंद्रा यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्याबद्दल अभिनंदन करतो. आपण माध्यमांचे घटक आहोत याची लाज वाटावी अशी स्थिती त्याकाळी होती. मी त्यावेळी सातत्याने यावर वेगवेगळ्या लिहित होते. त्यावेळी मी माध्यमांचं गिधाडीकरण झालं आहे असा शब्द वापरला होता. ज्या वाईट रितीने रियाला टार्गेट करण्यात आलं होतं, ते अस्वस्थ कऱणार होतं. आता 5 वर्षानंतर एका माध्यमाचे प्रमुख आपला थेट सहभाग नसतानाही जाहीर माफी मागतात ही खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी फार मोठं मन असावं लागतं. माध्यम क्षेत्रात हा अपवाद आहे,” अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी दिली आहे.

“तुम्ही जो काही दगड आकात भिरकावला आहे त्यातून काहीतरी व्हावं अशी आशा आहे. ही एकाची नाही तर सामूहिक जबाबदारी आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण त्याला म्हणत असतो. अनेक देशात माध्यमांची स्थिती पाहता, लोकशाही पाठच्या स्थरावर गेली आहे. उजव्या बाजूचं राजकारण तिथे आलं आहे. आपल्या देशात गेल्या 10 वर्षांपासून होत आहे. या प्रकरणी मी त्यावेळी काँग्रेसतर्फे बाजू मांडत होतो. राजकारण किती खालच्या स्तराला गेलं होतं हे त्यावेळी दिसत होतं. खऱ्या अर्थाने भाजपाने याचं खालच्या स्तराचं राजकारण केलं. महाविकास आघाडी सरकारला खाली आणणं आणि बिहार निवडणुकीत फायदा व्हावा हादेखील हेतू होता,” असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले आहेत,

 





Source link