पुणे: राष्ट्रीय एजन्सी एनआयएने (NIA) आज महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात केलेल्या छापेमारी व कारवाईनंतर इसिस मॉड्युल (ISIS Module) हे पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या रडारवर आलेला आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये एनआयएने छापा टाकला आहे. एका विद्यार्थ्याची एनआयए पथकाकडून चौकशी सुरू आहे. विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा संशय आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अमरावतीबरोबर पुणे– गुलटेकडी येथे राहणाऱ्या तरुणाची एनआयएकडून चौकशी NIA ने केली आहे.
अमरावती जिल्ह्याच्या अचलपूरमध्ये एनआयएने छापेमारी केली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये एनआयएच्या पथकाकडून छापेमारी करून एका 19 वर्षीय युवकाला घेतलं ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या 19 वर्षीय युवकाची अमरावती येथील जोग क्रीडा संकुल मधील मंथन हॉल याठिकाणी चौकशी सुरू आहे. NIA टीम नी ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या घरून काही कागदपत्रे आणि लपटॉप आणल्याची माहिती समोर आली आहे. अचलपूरच्या अकबरी चौक मधील बियाबानी गल्लीतून तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून जिहादी संघटनांच्या संपर्कात
राष्ट्रीय एजन्सी एनआयएने ताब्यात घेतलेला तरुण हा अचलपूर येथील महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी सोशल मीडिया, विशेषत: व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून जिहादी संघटनांच्या संपर्कात होता. हा विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याच्या संशयावरून एनआयएचा पथक स्थानिक एटीएस आणि जिल्हा पोलिसांच्या पथकासह आज पहाटे 4 वाजता अचलपूरला पोहोचले होते.
गुलटेकडी येथे राहणाऱ्या तरुणाची एनआयएकडून चौकशी
पुण्यातील गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या तरुणाकडे NIA ने चौकशी केलीय. त्याचबरोबर एन.आय.ए.च्या गुन्ह्यात आधीपासून आरोपी असलेल्यांच्या घरी जाऊन देखील चौकश करण्यात आली आहे. NIAच्या बंगळूरुमधील पथकाने ही कारवाई केलीय. पुण्यातील अरिहंत कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या 19 वर्षीय साफवान शेखची एनआयएकडून चौकशी करण्यात आली आहे. साफवानकडून मोबाईल आणि इलेक्ट्रॅानिक डिव्हाइस जप्त करण्यात आलेत. साफवान हा बेंगलोरस्थित इसिस मॅाड्यूलच्या टेलिग्राम गृपमध्ये सहभागी असल्याने चौकशी करण्यात आली आहे. NIA ने अलिकडच्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर छापे टाकले आहेत आणि ISIS च्या दहशतवादी कट प्रकरणात अनेक दहशतवादी कार्यकर्त्यांना अटक करून वेगवेगळ्या ISIS मॉड्यूल्सचा पर्दाफाश केला आहे.
हे ही वाचा :