पंढरपूर: पंढरपूरहून अकोला जिल्ह्यातील अकोटकडे निघालेल्या एसटी बसमधील चालक आणि वाहकाने चक्क दारूच्या नशेत बस चालवल्याची गंभीर घटना समोर आली होती. या प्रकारामुळं 37 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी संताप व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, यातील संतप्त प्रवाशांच्या तक्रारीनंतर बीड पोलीस आणि एसटी प्रशासनाने दोघांना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सुरू होता. अकोला जिल्ह्यातील अकोट आगाराच्या दारू पिऊन बस चालविणाऱ्या चालक आणि वाहकाचे निलंबन करण्यात आले आहे. ‘एबीपी माझा’च्या बातमीनंतर हा दणका देण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागीय नियंत्रकांने ही कारवाई केली आहे.
पंढरपूरवरून वारकऱ्यांना घेऊन बस अकोटकडे येत असताना बीड,-अंबड मार्गावर चालक आणि वाहक दारूच्या नशेत धुंद झाले होते. बसमध्ये दोन लहान मुलांसह होते 37 प्रवासी प्रवास करत होते. दारूचे अति सेवन केल्यामुळे चालक आणि वाहकाला बसचं नियंत्रण करण्यात अडचणी येत होत्या. चालक संतोष रहाटे आणि वाहक मनीष झालटे यांचं निलंबित करण्यात आलं आहे. चौकशी अहवालात दोघांनीही दारूचे सेवन केल्याचे उघड झाल्यानंतर दोघांवरही बडतर्फीच्या कारवाईची शक्यता वर्तवली होती. या धक्कादायक प्रकाराची बातमी ‘एबीपी माझा’ने काल दाखवली होती.
37 प्रवाशांचा जीव धोक्यात
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अकोट आगाराची एमएच-14-6140 क्रमांकाची ही बस असून ही बस पंढरपूरहून अकोटकडे प्रवास करत होती. यातील चालक संतोष रहाटे आणि वाहक संतोष झालटे हे बस चालवत होते. दरम्यान हे दोघे दारू पिऊन असल्याचे निदर्शनास आले होते. यावेळी बसमध्ये 37 प्रवाशी प्रवास करत असून या साऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. अशातच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र एकीकडे राज्यात होणारे अपघात आणि त्यात नाहक बळी पडणाऱ्या घटना लक्ष्यात घेता बस चालकाचा असा बेजबाबदारपणा समोर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. परिणामी राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर संबंधित विभाग या प्रकरणी नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस चालक व वाहकाने दारूच्या नशेत सेवा बजावल्याचा धक्कादायक प्रकार अकोट आगाराच्या बसमध्ये समोर आला आहे. MH-14-6140 क्रमांकाची एसटी बस गुरुवारी दुपारी पंढरपूरहून अकोटकडे प्रवास करत असताना हा प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, चालक संतोष रहाटे आणि वाहक संतोष झालटे हे दोघेही या बसमध्ये ड्युटीवर होते. दुपारी 4 वाजता बस पंढरपूरहून निघाली, त्यामध्ये एकूण 37 प्रवासी होते. त्यात महिला, पुरुष तसेच दोन लहान मुलांचाही समावेश होता. बसने प्रवास सुरू केल्यानंतर काही वेळातच प्रवाशांना चालक आणि वाहकच्या वागणुकीत काहीतरी गडबड असल्याची शंका आली. त्यांचा दारूच्या नशेत असल्याचा संशय प्रवाशांनी व्यक्त केला आणि हा प्रकार पुढे आला
आणखी वाचा