Akola Crime news: कल्याण रेल्वे स्थानकात फिरण्यासाठी आलेल्या एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवून तिला रेल्वेने अकोल्याला नेत असताना इगतपुरी ते अकोला (Akola News) दरम्यान एका नराधमाने या अल्पवयीन मुलीवर बलात्कार(Rape News) केल्याची घटना उघडकीस आली आहे . धक्कादायक म्हणजे या नराधमाने तिला अकोला येथील आपल्या घरी नेले. मात्र, घरच्यांनी स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याने पुन्हा तिला अकोला रेल्वे स्थानकात सोडून तो पसार झाला . यानंतर अकोला रेल्वे पोलिसांच्या नजरेस हि मुलगी पडली त्यांनी चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

अकोला रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत हा गुन्हा कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही च्या आधारे या नराधमाचा शोध सुरू केला . धक्कादायक म्हणजे दोन वर्षांपूर्वी याच अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार   केला होता . याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे .

कल्याण पूर्वेत राहणारी 16 वर्षीय तरुणीची मानसिक स्थिती ठीक नव्हती . 29 जून रोजी ही तरुणी कल्याण स्टेशन परिसरात आली होती. कल्याण पश्चिमेकडून पूर्वेकडे पादचारी पुलावरून जात असताना एका तरुणाने तिला हेरत तिच्याशी ओळख वाढवत तिच्याबरोबर चालत तो कल्याण पूर्वेकडे आला. त्याने तिच्याशी गप्पा मारत तिला आपल्या भावाच्या घरी नेले. मात्र भावाने घरात घेण्यास नकार दिल्याने तो तिला परत कल्याण रेल्वे स्थानकात घेऊन आला.

कल्याण स्थानकातून त्याने मुलीसोबत अकोल्याकडे जाणारी एक्स्प्रेस पकडली. दरम्यान इगतपुरी ते अकोला दरम्यान त्याने या मुलीशी लगट करत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तो तिला त्याच्या अकोला येथील घरी घेऊन गेला. मात्र, घरच्यांनीही तिला स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याने पुन्हा तिला अकोला रेल्वे स्थानकात आणून सोडून दिले. यानंतर पोलिसाच्या नजरेस पडलेल्या या पिडीत तरुणीला रेल्वे पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेत तिची चौकशी केली असता तिने घडलेली घटना कथन केली. या गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत हा गुन्हा कल्याण रेल्वे पोलिसाकडे वर्ग केला आहे. तर या तरुणीला कल्याण रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरु असल्याचे कल्याण रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले.

आणखी वाचा

मुंबईत गे रिलेशनशिपमधील प्रसिद्ध CAचं टोकाचं पाऊल, शरीरसंबंधांची क्लीप व्हायरल करण्याची धमकी, 22 वर्षांच्या तरुणीला अटक

आणखी वाचा



Source link