Amravati News अमरावती : भारतीय जनता पार्टीचे (BJP) राज्यसभेचे खासदार  डॉ. अनिल बोंडे (MP Dr. Anil Bonde) यांनी काँग्रेस नेत्यांवर (Congress) टीका करताना एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या टीकेमुळे आता पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता बळावली आहे. तिवसा मतदारसंघ काँग्रेसच्या जंगली प्राण्याने उद्ध्वस्त केला आहे. त्यामुळे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे काँग्रेसचे डुक्कर घुसतात त्यांना झटका लावलाच पाहिजे, अशा शब्दात बोंडे यांनी काँग्रेसवर (Congress) प्रखर टीका केली आहे. अमरावतीच्या (Amravati News) तिवसा शहरात कबड्डी सामन्याच्या उद्घाटन सोहळ्यात बोंडे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. 

…त्यांना झटका लावलाच पाहिजे

सध्या राज्यात आणि देशात निवडणुकांचे वारे वाहत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी जवळजवळ सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली असून जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा शाब्दिक चकमक तर कुठे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याचे चित्र आहे. अशातच भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे हे पुन्हा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. अमरावतीच्या तिवसा शहरात कबड्डी सामन्याच्या उदघाटन सोहळ्यात बोंडे यांनी काँग्रेसवर टिका करताना बोंडे यांची जीभ घसरली आहे.

यावेळी अनिल बोंडे म्हणाले, ‘आज सोलर झटका मशीन, डास झटका मशीन उपलब्ध आहेत. या मशीनचा वापर जंगली डुक्कर, जंगली प्राणी शेतात, रानावनात आले तर त्यांना झटका देण्यासाठी या मशीनचा वापर करण्यात येतो. त्याचप्रमाणे तुमचा तिवसा मतदार संघ पूर्णपणे काँग्रेसच्या जंगली प्राण्यांनी उद्ध्वस्त केला आहे. ज्याप्रमाणे डास सोलर झटका मशीन आहे, डास झटका मशीन आहे, त्याचप्रमाणे आता या तिवसा मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये हे काँग्रेसचे जे डुक्कर घुसतात ना त्यांना झटका लावलाच पाहिजे. तेव्हा कुठे संपूर्ण महाराष्ट्राची प्रगती आहे. तेव्हाच पूर्ण देशाची प्रगती आहे. अशा शब्दात खासदार डॉ. अनिल बोंडे यानी काँग्रेसवर प्रखर टीका केली आहे. त्यांच्या या वक्तव्यांनंतर पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता बळावली आहे. 

डॉ अनिल बोंडे यांच्या डोक्यात फरक पडला आहे – यशोमती ठाकूर

अनिल बोंडे कायम वाद-विवाद करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. याआधी त्यांनी मुख्यमंत्र्यांना बेडूक म्हटलं, आता त्यांनी काँग्रेसवाल्यांना डुक्कर म्हटलं, त्यामुळे त्यांची संस्कृती आणि वागणं यातून दिसत आहे. डॉक्टर बोंडे हे सुशिक्षित आहे, शिकलेले आहे की नाही कळायला मार्ग नाही. पदोपदी तुम्ही महिलांचा अपमान करता तुमचा पक्ष तुम्हाला हेच शिकवतं का, असा प्रश्न आमदार यशोमती ठाकूर यांनी विचारत खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यावर टीका केली आहे.

याआधी आमच्या युवक काँग्रेसने त्यांची मेंटल हॉस्पिटलमध्ये नोंद केली होती. आता अनिल बोंडे ते सिद्ध करत आहे. खरच त्यांच्या डोक्यात फरक पडला आहे. एका साध्या शेतकऱ्यांच्या पोरांना त्यांना पाडले आहे, त्यांना जे आज खासदारकीचे  गिफ्ट मिळाल आहे ते कॉन्ट्रोव्हर्सी करून मिळाला आहे. दंगली करवत, स्वतःसाठी बक्षीस मिळवतात. त्यामुळे असे वाद-विवाद करून चर्चेत राहण्याचा ते प्रयत्न करत असल्याचे देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link