Akola Crime News: अकोला : अकोला (Akola) जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात दिल्लीतल्या एका 26 वर्षीय तरुणीची हत्या (Crime News) करण्यात आलीय. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर शहरातील प्रतिक नगरात हा हत्येचा थरार घडलाय. सोबत राहणाऱ्या तिच्या मित्रानेच हा खून केल्याचा संशय मूर्तिजापुर पोलिसांकडून व्यक्त केलाय. तरुणीच्या डोक्यावर अधिक वार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक कारण तपासात पुढे आलंय. शांतीक्रिया प्रशांत कश्यप (वय 26) असं खून करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे. तर कुणाल उर्फ़ सनी शृंगारे असं संशयित मारेकरी तरुणाचं नाव आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील दोघांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. यात कुणालनं काम देतो म्हणून शांतीक्रियाला दिल्लीहुन अकोल्यात बोलावून घेतलं होतं. त्यानंतर दोघे सोबत राहू लागले होते. मात्र काल रात्री दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला, अन् रागाच्या भरात कुणालने तिच्या डोक्यावर धारदार शस्त्रानं वार केल्याने दुर्दैवी मृत्यु झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अकोल्यात या हत्येच्या घटनेने मात्र मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय होतंय संपूर्ण प्रकरण?
शांतीक्रिया प्रशांत कश्यप (वय 26) मूळ आसाम राज्यातील रहीवासी असून अनेक वर्षापासून ती तिच्या आईबरोबर दिल्ली शहरात राहत होती. शांतिक्रिया ही प्रसिद्द टॅटू आर्टिस्ट (Tattoo Artists) होती. दरम्यान काही महिन्यांपूर्वी तिची ओळख यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस इथल्या कुणाल उर्फ़ सनी शृंगारे या तरुणासोबत झाली. कुणालने शांतिक्रीयाला काम देतो म्हणून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर शहरात बोलावलं होतं. साधारणतः 21 जुलै रोजी ‘ती’ मुर्तीजापुर शहरात दाखल झाली. कुणाल हा तिला सोबत घेत शहरातील वैशाली वाईन बारमध्ये गेला, आणि काम मागितले. मात्र बार मालकानं काम द्यायला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर दोघेही तिथून परतले. विशेष म्हणजे कुणाल हा पाच ते सहा महिन्यांपूर्वी याच वाईनबार मध्ये वेटरशिप करत असायचा.
काम शोधात खाली हात परतल्याने पुढं दोघांनाही मूर्तिजापूर शहरात राहायचं ठरवलं. शहरातील प्रतिक नगर येथील शुभम महाजन आणि मनोज व्यास यांच्या जागेत खोली करून ते राहू लागले. दोन दिवस व्यवस्थित गेलेत, मात्र कुणालला दारूचे व्यसन असल्यामुळे दोघांमध्ये वाद झाले, काल मध्यरात्रीही दोघांमध्ये वाद झाले, याचं वादातून त्याने शांतीक्रिया हिच्या डोक्यात जड अवजारांना वार करून गंभीर स्वरूपात जखमी केलंय, त्यात तिचा मृत्यु झाल्याच समजते आहे. विशेष म्हणजे हत्येच्या घटनेपासून कुणाल हा फरार आहे. अशी माहिती मूर्तिजापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी ‘माझा’शी बोलतांना दिली.
हत्येनंतर मारेकरी फरार
आज सकाळी घरमालक शुभम महाजन यांना खोलीत शांतिक्रियाचा मृतदेह दिसून आला. लागलीच या संदर्भात मूर्तिजापूर शहर पोलिसांना माहिती देण्यात आली, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्यास्थित पंचनामा करून मृतदेह वैद्यकिय तपासणीसाठी अकोला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय. कुणालच्या शोधार्थ पोलिसांच्या स्थानिक शाखेचे पथक आणि स्थानिक पोलिसांचे विविध पथक रवाना झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..