Crime News Women Sexual Herrasment Inside Car: ठाण्यातील कुटुंब न्यायालयाच्या आवारात एका विवाहित महिलेवर दोघा पुरुषांनी कारमध्ये सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा सारा प्रकार पोलिसांचा सतत वावर असलेल्या न्यायालयासारख्या संवेदनशील इमारतीच्या परिसरात घडला आहे. पोलिसांबरोबरच सर्वसामान्यांची वर्दळ असलेल्या ठाण्यासारख्या गर्दीच्या शहरात सार्वजनिक ठिकाणी हा प्रकार घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Add Zee News as a Preferred Source

नक्की घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी महिलेला नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने बोलावले होते. या महिलेच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या केकमध्ये गुंगीचे औषध मिसळून तिला केक खाऊ घालण्यात आला. त्यानंतर ती बेशुद्ध पडल्यावर आरोपींनी हे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप आहे. ही घटना 25 ऑगस्ट 2024 रोजी घडली असल्याचे सांगितले जात असून, पीडित महिलेने 5 डिसेंबर 2025 रोजी ठाणे नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

इतक्या दिवस का शांत राहिली महिला?

जवळपास 15 महिन्यांपूर्वी हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत असताना पीडित महिला इतक्या दिवस का शांत राहिली असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी आरोपींनी महिलेसोबत घृणास्पद कृत्य केले तेव्हा त्यांनी त्याचे चित्रिकरणही केले होते. या महिलेचा अश्लील व्हिडिओ तयार करून आरोपींकडून महिलेला वारंवार दोघांनी ब्लॅकमेल केलं. त्यामुळेच ही महिला तक्रार करत नव्हती. मात्र सततच्या त्रासाला कंटाळलेल्या या महिलेचा संयम संपला आणि तिने 5 डिसेंबर रोजी म्हणजेच घटना घडल्यानंतर सव्वा वर्षाने तक्रार दाखल केली.

आरोपी कोण?

आरोपींपैकी एक हिरालाल केदार (युट्यूब पत्रकार) याला अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी रवी पवार फरार आहे. ठाणे नगर पोलिसांकडून पवार येथे तपास सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, न्यायालयाच्या आवारात अशी घटना घडल्याने सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ठाण्यात महिला अत्याचाराचं वाढतं प्रमाण

ठाण्यामध्ये मागील काही काळापासून महिलांवरील अत्याचारासंदर्भातील घटना घडल्या आहेत. ठाण्यात एका व्यक्तीने स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलीवर जून 2025 पासून डिसेंबरपर्यंत सतत अत्याचार केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच समोर आला. पीडितेच्या आईने जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. आरोपी वडीलांवर गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरू आहे. ठाण्यातच 14 जुलै रोजी शाळकरी मुलींना ‘मासिक पाळी तपासणी’च्या नावाखाली कपडे काढण्यास भाग पाडण्यात आले. या प्रकरणावरूनही वातावरण चांगलेच तापले होते.

 

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp