Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही एक जुलैपासून सुरू केलीय. या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया (Offline Application Process) सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीसाठी 15 जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या नोंदणी केंद्राबाहेर महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
अशातच अमरावतीत (Amravati News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तलाठी तुळशीराम कंठाळे यांच्यावर कारवाई करत तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी याबत आदेश देत ही कारवाई केली आहे. अमरावतीतील (Amravati News) हे प्रकरण ताजे असतानाच आता अमरावती पाठोपाठ अकोल्यात देखील तलाठी पैसे घेत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. राज्य सरकारनं महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केलीये. त्यानंतर राज्यात या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिला तलाठी कार्यालयासमोर मोठी गर्दी करत आहेत.
अमरावती पाठोपाठ अकोल्यातही लाभार्थ्यांची आर्थिक लूट
यादरम्यान या योजनेचे अर्ज भरताना महिलांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. अकोल्यातून देखील काही व्हिडीओ समोर आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता अमरावती प्रमाणेच अकोल्यात देखील कारवाईचा बडगा उगारला जातो का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला अपेक्षित असून उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी पटवारीचा दाखला देखील तितकाचं महत्वाचा असतो. त्यासाठी अकोल्यातल्या मोठी उमरी भागातल्या एका तलाठी कार्यालयावर महिलांची प्रचंड गर्दी झाली आहे. या दरम्यान तलाठी चक्क पटवारीचा दाखला देण्यासाठी महिलांकडून 30 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत शुल्क आकारत आहेत. मोठी उमरीतल्या तलाठी कार्यालयातील आज सायंकाळी 4 वाजताच्या सुमाराचा हा प्रकार समोर आला आहे. त्यामूळे आता अमरावती पाठोपाठ अकोल्यात देखील तलाठी पैसे घेतानाचा हा व्हिडिओ समोर येतो आहे.दरम्यान, या प्रकारामुळे राज्याच्या अनेक भागात लाडकी बहिण योजनेखाली महिलांची लूट सुरू असल्याचं सर्रासपणे दिसून येत आहे.
सेतू सुविधा केंद्रात महिलांची गर्दी
शासनाने नेव्याने सुरू केलंल्या माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. त्या अनुषंगाने अधिवास आणि उत्पन्नचा दाखला काढण्यासाठी महिलांची सेतू केंद्रात मोठी गर्दी केल्याचे चित्र सकाळपासून पहावयास मिळत आहे. यातही लाडकी बहिण याची साईट बंद आहे, तर सेतू केंद्राचे सर्व्हर डाऊन असल्याने अर्ज घेण्यास महिलांना दीड ते दोन तास लागत आहे. अधिवास दाखवण्यासाठी महिलांना जन्मचा दाखल्याची अट असल्याने अनेक महिलांना अडचण निर्माण झाली आहे. अशातच या योजनाचा कालावधी हा 15 दिवसाचा आहे. त्यामुळे योजनेतील अटी शिथिल करून योजनेचा कालावधी वाढवावा, अशी मागणी महिला करीत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या वयामध्ये शिथिलता कऱण्यात आली आहे. वयोमर्यादा आता 5 वर्षांनी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता 65 वर्षांपर्यंतच्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. याआधी 21 ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता. पण आता ही मर्यादा 65 वर्षांपर्यंत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर केला आहे. त्याशिवाय ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. परंतु, ही जमिनीची अटही आता शिथिल करण्यात आली आहे. जमिनीच्या मालकीची अट काढण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..