Ali Khamenei : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींचा इस्त्रायलनं शनिवारी खात्मा केला, शनिवारी सकाळी खामेनींच्या घरावर 30 बॉम्ब टाकत इस्त्रायलनं खामेनींचं घर उद्धवस्त केलं, दरम्यान या हल्ल्यात खामेनींचा मृत्यू झाला, मात्र यानंतर खामेनींचा घरभेदी कोण आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटल्यानंतर खामेनी हे सुरक्षितस्थळीच होते, ते कोणत्या ठिकाणी आहेत याची माहिती इस्त्रायलकडे नव्हती मात्र, खामेनींच्या जवळचाच गद्दार निघाल्याची चर्चा आता सुरू झालीय. त्या गद्दारानं दिलेल्या माहितीनंतरच इस्त्रायलनं हल्ला करत खामेनींचा खात्मा केला.

Add Zee News as a Preferred Source

कसा केला खामेनींचा खात्मा?

खामेनी हे सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शमखानी आणि IRGCचे प्रमुख मोहम्मद पाकपूर यांच्यासोबत बैठक घेत होते. इस्रायलच्या स्थानिक वृत्तवाहिनीनुसार गुप्तचर यंत्रणा बराच काळ अली शमखानी यांच्यावर नजर ठेवून होत्या. अली शमखानी हे खामेंनींना भेटण्यासाठी त्या सुरक्षित ठिकाणी पोहोचले, त्याचवेळी संयुक्त हवाई हल्ला करण्यात आला. खामेनींनी मारण्यासाठी आधी रात्री हल्ल्याची रणनीती आखण्यात आली होती, मात्र त्यात बदल करून हल्ला सकाळी करण्यात आला. या हल्ल्यात आयातुल्ला खामेनींह इतर काही जणांचा मृत्यू झाला, त्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश होता. 

सीआयए बऱ्याच काळापासून इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या कारवायांवर लक्ष ठेवून होती. स्थानिक वृत्तवाहिनीच्या मते, अमेरिकन आणि इस्रायली गुप्तचर अधिकाऱ्यांनी खामेनींच्या दैनंदिन दिनचर्येचा बारकाईनं अभ्यास केला होता, ज्यामध्ये “तो कुठे राहत होता, कोणाला भेटला?, तो कसा संवाद साधत होता आणि हल्ल्याचा धोका निर्माण झाल्यास तो कुठे आश्रय घेऊ शकतो” या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवण्यात आलं आणि त्यानंतर योग्य प्लानिंग करून खामेनी असलेल्या ठिकाणी इस्त्रायल आणि अमेरिकेनं हल्ले केलेत आणि या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला, अमेरिका आणि इस्त्रायलनं 30 शक्तिशाली बॉम्ब खामेनी असलेल्या ठिकाणी डागले. 

हेही वाचा :  मध्यपुर्वेतील युद्धाचा विश्वव्यापी परिणाम; जलवाहतूकही ठप्प… मुंबईच्या बंदरावर अडकले हजारो कंटेनर

खोमेनींच्या घरावर 30 बॉम्ब टाकले​ : 

वॉल स्ट्रीट जर्नलनुसार  GBU-28 लेजर गाइडेड पेनेट्रेटर बॉम्बचा वापर हल्ल्यासाठी करण्यात आला. इस्त्रायलच्या फाईटर विमानांनी खोमेनींच्या घरावर 30 बॉम्ब टाकलेत. GBU-28 2 हजार 268 वजनाचे 30 बॉम्ब खोमेनींच्या घरावर टाकण्यात आलेत. या बॉम्बचा वापर बंकरमध्ये बनवलेल्या सुरक्षीत जागांवर हल्ला करण्यासाठी करण्यात येतो. इस्त्रायलचं फायटर विमान F-15I हे फक्त GBU-28चे 2 बॉम्ब घेऊन जाऊ शकतं. त्यामुळे खामेनींच्या घरावर हल्ला करण्यासाठी अनेक विमानांचा वापर करण्यात आला. 

आयातुल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर अयातुल्ला अलिरेझा अराफी यांची सर्वोच्च नेते म्हणून आता निवड करण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर इराण आक्रमक झाला असून त्यांनी इस्त्रायल आणि अमेरिकेला थेट धमकी दिली आहे, मोसादनं आखलेल्या रणनीतीनंतर हवाई हल्ले करून खामेनींचा खात्मा केला, मात्र खामेनींची माहिती देणारा तो कोण? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp