Konkan Railway Ganpati Special Train 2025 : गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात. गणेशभक्तांच्या सोईसाई मध्य रेल्वे तर्फे अतिरिक्त ट्रेनची सुविधा करण्यात आली आहे. मध्य रेल्वेतर्फे एकूण 296 गणपती विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत. गणेश चतुर्थी दरम्यान उत्सवाच्या गर्दीला तोंड देण्यासाठी मध्य रेल्वेने 44 अतिरिक्त विशेष गाड्यांची घोषणा केली आहे, ज्यामुळे गणपती विशेष गाड्यांची एकूण संख्या 296 झाली आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि सावंतवाडी रोड दरम्यान आठ द्विसाप्ताहिक सेवांचा समावेश आहे. या रेल्वे 28 आणि 31 ऑगस्ट आणि 4 आणि 7 सप्टेंबर रोजी दोन्ही मार्गांवर धावतील. एलटीटी-सावंतवाडी विशेष (ट्रेन क्रमांक 01131) सकाळी 8:45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10:20 वाजता आपल्या गंतव्यस्थानी पोहोचेल. परतीची सेवा (ट्रेन क्रमांक 01132) सावंतवाडी रोडवरून रात्री 11:20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:30 वाजता एलटीटी येथे पोहोचेल. या रेल्वे ठाणे, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कणकवली आणि सिंधुदुर्ग यासारख्या प्रमुख कोकण पट्ट्यातील स्थानकांवर थांबतील. या कोचमध्ये एसी 3-टायर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड-क्लास कोच असतील.
याव्यतिरिक्त, मध्य रेल्वे दिवा आणि खेड दरम्यान 36 अनारक्षित मेमू सेवा चालवेल. 22 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान दररोज या दोन्ही दिशेने 18 फेऱ्या चालवल्या जातील. दिवा-खेड ट्रेन दुपारी 1:40 वाजता सुटेल, तर खेडहून परतीची सेवा सकाळी 8 वाजता सुटेल. दरम्यान, दिवा-चिपळूण मेमू सेवा, जी मूळतः 38 फेऱ्यांसाठी होती, ती आता 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान 40 फेऱ्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
गणेशोत्सवानमित्त यंदा कोकणवासीयांसाठी विशेष मोदी एक्स्प्रेसची मोफत सुविधा मिळणार आहे. सालाबादाप्रमाणे मंत्री नितेश राणेंनी यंदाही ही सेवा उपलब्ध करुन दिल्याची माहिती दिलीय . या उपक्रमाचं हे 13वं वर्ष आहे, 23 आणि 24 ऑगस्टला मुबंईतील दादरमधून सुटणारी या ट्रेन सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. 18 ऑगस्टपासून या ट्रेनची मोफत तिकीटं मिळण्यास सुरुवात होणार आहे.