नागपूर : गेली 70-75 वर्षे ओबीसी (OBC) नेते  सत्तेत होते, तेव्हा  त्यांनी ओबीसी समाजासाठी काय केलं? असा थेट सवाल आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला. गेल्या 75 वर्षापासून जर शेतीचे प्रश्न मिटले असते, मजुराला चांगली मजुरी मिळाली असती तर आरक्षणाचा हा मुद्दा समोर आलाच नसता हे सूर्य प्रकाशाएवढे सत्य आहे. त्यामुळे ओबीसी सभेप्रमाणेच (Jalna OBC Sabha) सर्व मतभेद, पक्ष विसरून ओबीसीसाठी एकत्र आलेल्या नेत्यांनी शेतकरी, शेतमंजुरांसाठी एकत्र यावे, आम्ही सुद्धा स्टेजवर येऊ असा  सल्ला बच्चू कडू यांनी दिला. जाती धर्माच्या नावाने लोक पेटतात हे राजकीय लोकांनी बरोबर हेरले आहे, त्यामुळे सर्व समाज बांधवांनी आपले कशात भले आहे हे ओळखले पाहिजे असे मत देखील बच्चू कडू यांनी बोलतांना व्यक्त केले आहे.

मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट कुणबी दाखले (Kunbi Certificate ) देऊ नये या प्रमुख मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये भव्य ओबीसी सभेचे (Jalna OBC Sabha) आयोजन करण्यात आले होते. या सभेस्थळी एकाच मंचावर ओबीसी समाजाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. त्यामध्ये  प्रामुख्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), महादेव जानकर (Mahadev Jankar), इत्यादींसह अनेकांचा समावेश आहे. यावर बच्चू कडू ( Bachchu Kadu) यांनी आपली प्रतिक्रिया देताना ओबीसी सभेला शुभेच्छा देत आता ओबीसी सभेप्रमाणेच सर्व मतभेद, पक्ष विसरून शेतकरी, शेतमंजुरांसाठी एकत्र या असा सल्ला दिला आहे.

कधी धर्माच्या नावानं चांगभलं, तर कधी जातीच्या नावानं चांगभलं

ओबीसी सभेवर (OBC Sabha) प्रतिक्रिया देतांना बच्चू कडू ( Bachchu Kadu) म्हणाले की, तुम्ही ज्यावेळी 70-75 वर्षे सत्तेत होते तेव्हा ओबीसी साठी काय केलं? कधी धर्माच्या नावानं चांगभलं, तर कधी जातीच्या नावानं चांगभलं. शेतकऱ्यांसाठी लोक पेटवून पेटत नाहीत, मात्र जाती धर्माच्या नावाने लोक पेटतात हे राजकीय लोकांनी बरोबर हेरले आहे. त्यामुळे सर्व समाज बांधवांनी आपले कशात भले आहे हे ओळखले पाहिजे.

तर आम्ही देखील स्टेजवर येऊ

आमदार बच्चू कडू म्हणाले की, येणाऱ्या काळात जातीपातीचे प्रश्न हे अधिक मोठे होणार आहेत. त्यावरून राजकारण होणार आहे, दोन समाजात लढाया लागणार आहे. मात्र प्रत्येक समाजाच्या लोकांना मी विनंती करतो की नेत्यांच्या भाषणावर भडकू नका. तुम्ही भडकले तर राजकारण्यांच भलं होणार आहे. माझ्यासारख्याचे भलं होणार आहे. आमचं भलं होण्यापेक्षा तुमचं भलं कशात हे ओळखा. कारण 75 वर्षापासून जर शेतीचे प्रश्न मिटले असते, मजुराला चांगली मजुरी मिळाली असती तर आरक्षणाचा हा मुद्दा समोर आला नसता. हे सूर्य प्रकाशाएवढे सत्य आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी समोर येत नाही याचं दुःख आहे. आज या निमित्ताने सर्व नेते एकत्र आले तसेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी सुद्धा सर्वांनी एकत्र यावं, आम्ही सुद्धा त्या स्टेजवर येऊ.

ही बातमी वाचा: 

 



Source link