Gold Rate Today: शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. याचे मुख्य कारण अमेरिकन डॉलरमध्ये आलेली वाढ आणि इस्राइल-ईराण या दोन देशांतील तणाव त्यामुळं सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी कमी झाली आहे. आता गुंतवणुकदारांचे लक्ष महागाईच्या आकड्यांवर आहे. ज्यामुळं फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याज दराबाबत संकेत मिळू शकतात. त्यामुळं सोन्याच्या दरात मोठे उलटफेर होताना दिसत आहे. 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरदेखील शुक्रवारी मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोनं आज 930 रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे. तर, चांदीदेखील स्वस्त झाली आहे. MCX वर सोनं 1013 रुपयांनी घसरले आहे. तर चांदी 408 रुपयांनी घसरून 1,06,347 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावले आहे. काल चांदीची किंमत 1.06,755 रुपये होती. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 0.4 टक्क्यांनी घसरून 3,313.23 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते.  या आठवड्यात सोनं 1.7 टक्क्यांने घसरले आहे. अमेरिकेच्या सोनं वायदादेखील 0.7 टक्क्यांच्या घसरणीसोबत 3.325.70 डॉलरवर पोहोचले होते. 

24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 930 रुपयांची घसरण झाली असून 98,020 रुपयांवर पोहोचले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 850 रुपयांची घसरण झाली असून 89,850 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 690 रुपयांची घट झाली असून 24 कॅरेट सोनं 73,520 रुपयांवर पोहोचलं आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  89,850 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  98,020 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट   73,520 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट  8,985 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट  9,802 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट   7, 352  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   78, 416 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   71, 880 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    58, 816  रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 89,850 रुपये
24 कॅरेट- 98,020 रुपये
18 कॅरेट- 73,520 रुपये





Source link