Akola  : अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोट तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील मुंडगाव येथे घराला लागलेल्या आगीत वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंडगावातील बाजारपूरा येथे राहणारे सचिन हरिभाऊ ठाकरे यांच्या घरातील बेडरुममध्ये त्यांचा 9 वर्षीय मुलगा झोपलेला असताना अचानक आग लागली. बेडरुममधून धूर निघत असल्याचे वडील सचिन हरिभाऊ ठाकरे यांच्या लक्षात येताच वडिलांनी मुलाला वाचवण्यासाठी धाव घेतली. यात वडील सचिन हे आगीत गंभीररित्या भाजले गेले होते. जखमी दोघांनाही अकोला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. 

सोन्या चांदीसह रोख 1 लाख 85 हजार रुपये जळून खाक

आगीत वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्यानं मुंडगावावर शोककळा पसरली आहे. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आग विझावण्यासाठी अग्नीशामक दल दाखल झालं होतं. पण तोपर्यंत गावकऱ्यांनी आग विझवली होती. या आगीत अंदाजे घरादील सोने चांदीचे 3 लाख 75 हजारांचे दागिने यासह कपडे व घरेलु साहित्य अंदाजे किंमत 3 लाख आणि रोख रक्कम 1 लाख 85 हजार रुपये जळून खाक झाली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Solapur Fire: पाण्याचे 100 बंब संपले, तरीही आग विझेना, मालकाच्या कुटुंबाला शोधायला भिंत फोडली, अग्निशमन दलाचे जवान भगदाडातून आत शिरले

अधिक पाहा..



Source link