School Sexual Assault Case : कोलकातामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या महिला डॉक्टरचा अमानुष छळ आणि त्यानंतर तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. ही घटना ताजी असताना अशीच एक धक्कादायक घटना बदलापूर (Badlapur Crime) शहरात घडली. बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याच्या संतापजनक प्रकार उजेडात आला. या संपूर्ण प्रकारचे पडसाद आता राज्यासह देशातही उमटत असताना राज्यात गेल्या काही दिवसात अशाच प्रकारचे अनेक प्रकरण पुढे आले आहे.
दरम्यान, अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथील घटना ताजी असतानाच पुन्हा अकोला जिल्ह्यातील हिंगणा तामसवाडी गावात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार झालाय. तर दुसरीकडे अमरावती शहरातील चपराशीपुरा भागातील मनपा मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 13 मध्ये पिटी शिकवणाऱ्या शिक्षकाने 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनी सोबत विनयभंग केलाय. त्यामुळे सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागलाय.
अकोल्यात पुन्हा 10 वर्षीय मुलीवर अत्याचार
बदलापूर आणि अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथील घटना ताजी असतानाच पुन्हा अकोला जिल्ह्यातील हिंगणा तामसवाडी गावात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार झालाय. अकोला शहरातल्या अकोटफैल पोलीस स्टेशनमध्ये हद्दीतील हिंगणा तामसवाडी येथे ही घटना घडलीये. तेल्हारा तालुक्यातील कुटुंब काही कामानिमित्त वल्लभनगर येथील आपल्या नातेवाईकांकडे आले होते. त्यानंतर त्यांनी मुलीला नातेवाईकांकड ठेवून ते बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत मुलीचा दूरचा नातेवाईक असलेला यश गवई याने तिच्यावर बळजबरी करत अत्याचार केलाय.
दरम्यान, घडलेला सर्व प्रकार 10 वर्षीय चिमुकलीने आई-वडिलांना सांगितला. त्यांनी लागलीच अकोटफैल पोलीस स्टेशन गाठलं. त्यानुसार या प्रकरणात पोलिसांनी रात्री (376 जुना कायदा) अत्याचार आणि बाल संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणातील संशयित आरोपी यश गवई याला देखील अटक केली आहे. आज सकाळी 4 वाजता हा गुन्हा दाखल झाला आहे. 24 वर्षीय आरोपी यश गवईवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आलीये. पोलीस उपविभागीय अधिकारी सतिष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात हा गुन्हा दाखल झालाय.
14 वर्षीय विद्यार्थीनीसोबत शिक्षकानेच केला विनयभंग
दरम्यान, अशीच एक संतापजनक घटना अमरावतीत घडली असून यात एका 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनी सोबत पिटी शिकवणाऱ्या शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना उजेडात आली आहे. अमरावती शहरातील चपराशीपुरा भागातील मनपा मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 13 मधील ही घटना आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकावर विनयभंग सह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षकाला रात्री अटक करण्यात आली आहे. तर हे प्रकरण उजेडात येताच परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
अल्पवयीन मुलगी ही शाळेत गेली तेव्हा शाळेच्या ब्रेक दरम्यान ती आजारी पडल्याने तिला वर्गात बसविले होते. तेव्हा सगळे मुलं-मुली तिच्या भोवती गोलाकार जमा झाले. तेव्हा पिडित विद्यार्थिनी सर्वांच्या मागे उभी होती आणि तिच्या मागे पिटीचे शिक्षक उभे राहिले. दरम्यान पिडीत विद्यार्थिनीचा या शिक्षकाने विनयभंग केला. यापूर्वी सुद्धा याच शिक्षकाने पिडितेला असाच प्रकार करत चल बाहेर फिरून येऊ, असे म्हटले होते. हा सगळा प्रकार पिडीत विद्यार्थिनीनी आपल्या आईला सांगितला तेव्हा 22 तारखेला फेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि पिटी शिक्षक रियाज सर याच्यावर विनयभंग सह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून रात्री त्याला अटक केलीय.
हे ही वाचा
अधिक पाहा..