ZP and Panchayat Election Result: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांनी विजयी गुलाल उधळला आहे, तर अनेक दिग्गज नेत्यांना फटका बसला आहे. जयकुमार गोरे, वरपूडकर यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा मोठा पराभव झाला आहे.

Add Zee News as a Preferred Source

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, अनेक राजकीय नेत्यांच्या घरात जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यात आली होती, मात्र, या निवडणुकीत दिग्गजांनी विजयी गुलाल उधळलाय.. पुणे, सोलापूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये दिग्गजांच्या नातेवाईकांनी बाजी मारली आहे…

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांचा विजय झाला आहे.. पारगाव, जरकवाडी गटातून त्यांचा विजय झाला आहे…

पुरंदर तालुक्यात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांची कन्या रूपाली झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला आहे.

माढ्यात तानाजी सावंतांच्या पुतण्याचाही विजय झाला आहे. पृथ्वीराज सावंतांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत विजय मिळवला आहे..

भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनीही जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघातील असगोली जिल्हा परिषद गटात आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांचा विजय

रायगडमध्ये आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनीही प्रतिस्पर्ध्याला धूळ चारत विजय मिळवला आहे.

12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांमध्ये अनेक मोठ्या नेत्याच्या नातेवाईकांनी पराभव स्वीकारावा लागलाय.. माजी मंत्री वरपूडकर यांच्या घरातील 5 पैकी 4 जणांचा निवडणुकीत पराभव झाला असून वरपूडकरांना मोठा धक्का बसलाय… तर तिकडे साता-यात जयकुमार गोरे यांचा भाऊ आणि वहिणींचा देखील पराभव झाला आहे. 

जयकुमार गोरेंचे बंधू अरूण गोरे यांचा माण तालुक्यातील कुकुडवाड गटात पराभव झालाय..

तर औंध गटातही जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरेंचा 40 मतांनी पराभव झाला आहे.

पेणचे आमदार रवींद्र पाटील यांच्या सून शर्मिला पाटील यांचाही पराभव

परभणीच्या दैठना जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या उमेदवार प्रेरणा समशेर वरपूडकर यांचा पराभव

लोहगाव जिल्हा परिषद सर्कलमधील उत्कर्ष वरपूडकर यांचा पराभव झाला आहे, ते आमदार सुरेश वरपूडकर यांचे पुतणे आहेत. 

सोनल जयंत देशमुख यांचा देखील पराभव झाला आहे, त्या वरपूडकर यांच्या कन्या आहेत…

सिंगणापूर गटातील माजी आमदार सुरेश वरपूडकर यांचे पुत्र समशेर वरपूडकर, याचा पराभव झाला आहे…  पांडुरंग खिल्लारे यांचा विजय झाला आहे. 

मिनी विधानसभा मानल्या जाणा-या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, अनेक नेत्यांना त्यांचा गड राखण्यात यश आलंय. तर काही नवख्या उमेदवारांनी अनेक दिग्गज नेत्यांचा गड भेदलाय.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp