Amol Mitkari : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रभर सुरु आहे. याबाबत दोन्ही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, यावर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतेचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी स्वागत केलं आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र यावं असं वक्तव्य केलं आहे.
तुतारी गटानेही अजित दादांच्या नेतृत्वात एकत्र यावं
महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याचा स्वागतच असल्याचे आमदार मिटकरी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरही मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा आदर्श घेऊन तुतारी गटानेही अजित दादांच्या नेतृत्वात एकत्र यावं असं मिटकरी म्हणालेत. त्यामुळं आता अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते काय प्रतिक्रया देतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात भक्कम होण्यासाठी जर तुतारी गटाला वाटत असेल तर त्यांनी अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र यावं असेही मिटकरी म्हणाले. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बेरजेचं राजकराण करणं माझं कर्तव्य असल्याचे मिटकरी म्हणाले.
रोहित पवारांच्या वक्तव्यावरही मिटकरींनी दिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. तसेच सर्वच कुटुंबांनी एकत्र यावं असं म्हटलं होतं. यावर मिटकरींनी तुतारी गटाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखी एकत्र यावं असं वक्तव्य केलं आहे. मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं होतं. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हीत असल्याचं वक्तव्य रोहित पवारांनी केलं होते.
महत्वाच्या बातम्या:
मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची मुद्द्यांवरून दिलजमाई? अनेक प्रश्नांवर एकच भूमिका?
अधिक पाहा..