Washim Crime: रुग्णांसाठी डॉक्टर देवदुताप्रमाणे असतो. पण कधीकधी डॉक्टरांच्या चुकीचा त्रास रुग्णांना सहन करावा लागतो. वाशिममध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय.
सोनोग्राफीद्वारे तपासणी
वाशिम च्या रिसोड शहरातील अमोल नरवाडे यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये 10 मे 2024 रोजी एका महिलेची सिझेरियन प्रसूती झाली. ती प्रसूती व्यवस्थित करण्यात आली असून त्या महिलेला कोणताही त्रास जाणवला नव्हता. त्यानंतर महिलेला थोडा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिने सोनोग्राफीद्वारे तपासणी केली. मात्र त्यातही काहीही आढळले नव्हते.
मॉब काढण्यात आला
तब्बल 1 वर्षाच्या कालावधीनंतर त्या महिलेला पोटाचा त्रास जाणवू लागला. नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार त्या महिलेला संभाजी नगरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिच्यावर शस्त्रक्रिया केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. तिच्या पोटातून एक मॉब काढण्यात आला.
डॉक्टरांचं स्पष्टीकरण
मात्र हा मॉब आम्ही जेव्हा सिझेरियन केलं त्या वेळी पोटात नव्हता.दरम्यान च्या काळात कुठे तरी त्यांनी शस्त्रक्रिया केली असता त्या वेळी तो रहाला असेल.यासाठी आमची कोणती ही चूक नसल्याचं डॉक्टर नरवाडे यांनी सांगितलं.
डॉक्टरविरोधात कारवाईची मागणी
याप्रकरणी रिसोड येथील खासगी रुग्णल्याचे डॉक्टर अमोल नरवाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान पीडित महिलेचे पती गणेश काबरा यांनी डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईची मागणी केलीय. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील कायदेशीर कारवाई करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय.
विवाहितेला दोरीने बांधून चटके
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात माहेरून पैसे घेऊन ये असं म्हणत 30 वर्षीय विवाहितेला घरात बांधून बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर दोरीने बांधून चटके दिले. सासरच्या लोकांकडून झालेल्या निर्दयी मारहाणीमध्ये विवाहिता गंभीर जखमी झाली आहे. ही घटना फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी येथे घडली. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजीम अब्दुल शेख राहणार चौका वाडी आणि नणंद शबाना निसार शेख आणि रिजवाना इम्रान शेख असे आरोपीचे नाव असून या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.