Bacchu Kadu अमरावती: भावना शून्य असलेले लोक सरकारमध्ये आहेत, त्यांना संवेदना नाहीत. आज राज्यात दर दिवशी दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. एमआरइजीएसच्या मजुरांची मजुरी अजून मिळाली नाही. एकीकडे पैसे नाही असं सांगायचं आणि आपल्या प्रदर्शनाची सामान्य माणसांना किती वेदना होत असेल याची कल्पनाही नाही. सत्तेवरचा अंकुश आता सुटलेला आहे. अशी बोचरी टीका  प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केली आहे. अंदाज समितीचा कार्यक्रम (Andaz Committee Controversy) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अंदाज समितीच्या सदस्यांची मेजवानी थेट चांदीची थाळीतून झाल्याचे समोर आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.यावर भाष्य करताना बच्चू कडू यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.  ते अमरावतीत (Amravati) बोलत होते.

दरम्यान, एखाद्या कसयाने रोज गाई-म्हशी कापायच्या आणि एकदा चारा खाऊ घालायचा याला काय अर्थ आहे? तुम्ही काय वेगळं करताय? रामाचे खरे भक्त असाल तर सांगा एकही ईडी चौकशी अजून भाजपच्या माणसावर का झाली नाही? तुमच्यात एकही भ्रष्टाचारी नाही का? तुम्ही आणीबाणी पेक्षाही वाईट वागले, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. असेही बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले. 

….कारण माझ्या आडनावामागे कडू लागलंय

अनेकांना वाटत होतं का बच्चू कडूचं मन पदात आहे. पण ते चुकीच आहे. आमदारकी गेली म्हणजे किंवा अध्यक्ष पद गेलं म्हणजे बच्चू कडू थांबनार, अस नाही. एखादी आमची जेल वारी झाली तरी आम्हाला फरक पडत नाही. मात्र तानाशाही किती करावी याची काही हद्द आहे. अपात्र केलं यांची फाईल एक महिना कुठे दाना खात होती? अजूनही मला अपात्रतेची नोटीस मिळाली नाही. बच्चू कडूला बदनाम करण्याचा हा प्रयत्न करत आहे. भाजप मधील काही लोक आम्हाला बदनाम करत आहे. बँक तोट्यात अशी आमची बदनामी विरोधक करत आहे. संचालक यांनी देखील बँकेची बदनामी करू नये. तर मी फडणवीस यांना फोन करेल, कॉम्परमाईज होईल, असं अनेकांना वाटत होतं. पण असं होणार नाही. कारण माझ्या आडनावा मागे कडू लागलेलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा



Source link