Marathi Employee assaulted in Mumbai: मुंबईत पुन्हा एकदा मराठी-अमराठी वाद पेटण्याची शक्यता आहे. याचं कारण एका मराठी तरुणाला मारहाण करण्यात आली असून, घाटी म्हणून हिणवण्यात आलं आहे. मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा यांनी ही मारहाण केली आहे. ‘तुम घाटी लोग नही सुधरोगे’ अशा शब्दांत मराठी तरुणाला शिवीगाळ केल्याचा दावा आहे. यानंतर मनसेने रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच असा जाहीर इशारा दिला आहे. याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा यांनी त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या मराठी तरुणाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. तुम घाटी लोग नही सुधरोगे म्हणत सुशील रहेजा यांनी मारहाण केली. तक्रारदार तरुण सुशील रहेजा यांच्या चेंबूर येथील कार्यालयात शिपाई म्हणून काम करत होता. क्षुल्लक कारणावरुन सुशील रहेजाने या तरुणाला मारहाण केली.
मारहाण का केली?
कागदपत्रावर स्टॅपल व्यवस्थित न जोडल्याच्या रागातून सुशील रहेजा यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचं समजत आहे. या घटनेनंतर तक्रारदार तरुणाने गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. रहेजा यांच्याविरोधात कलम 115 बीएनएस 2023 सह अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम) 1989 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मनसेने दिला इशारा
मनसे नेते गजानन काळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटनेवर संताप व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसला नाही, तर ही अवस्था आहे मुंबईतील मराठी माणसाची अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. इतकंच नाही तर रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच असा इशाराही दिला आहे.
“तुम घाटी लोग सुधारोगे नही” म्हणत…
मुंबईतील बिल्डर सुशील रहेजा कडून मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ…
भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसला नाही, तर ही अवस्था आहे मुंबईतील मराठी माणसाची …केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईत सत्ता भाजपची आल्यामुळे रहेजा नावाच्या बेडकांची…
— Gajanan Kale (@MeGajananKale) February 3, 2026
“तुम घाटी लोग सुधारोगे नही” म्हणत…मुंबईतील बिल्डर सुशील रहेजा कडून मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ…भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसला नाही, तर ही अवस्था आहे मुंबईतील मराठी माणसाची …केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईत सत्ता भाजपची आल्यामुळे रहेजा नावाच्या बेडकांची डराव-डराव वाढली आहे…आता पाहूया आशिष शेलार, साटम आणि फडणवीसांच्या आशीर्वादाने सुशील रहेजा तुरुंगात जातो की बाहेर राहतो. मीरा-भाईंदरला मेहता महापौर, तर मुंबईत रहेजा बिल्डर कडून मराठी तरुणाला मारहाण… या घटना सूचक नाही तर धोक्याची घंटा आहेत …!!! बाकी, रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच,” असं त्यांनी म्हटलं आहे.