अकोला : दारूच्या नशेत शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन आणि शिवीगाळ करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाचे निलंबन करण्यात आलं आहे. प्रभुदास गंडलिंगे असं निलंबित झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचं नाव आहे. अकोल्याचे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी ही कारवाई केली. 

पोलिस अधिकारी गंडलिंगे यांने एका शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यासोबत शाब्दिक वाद घातला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. हा वाद झाला त्यावेळी PSI गडलिंगे हा दारुच्या नशेत होता. त्याने नशेत शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करत निलंबनाच्या कारवाईची धमकी दिली होती.

अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी

सरन्यायाधीश भूषण गवई माझे भाऊ आहेत. तुझ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करतो अशी गडलिंगेने वैद्यकीय अधिकाऱ्याला दिली. याची तक्रार त्या वैद्यकीय अधिकाऱ्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

अकोल्यातीलचं दहीहंडा आरोग्य प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सागर कळसकर आणि दहीहंडा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक प्रभुदास गडलिंगे यांच्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  यामध्ये ‘तू आरोग्य केंद्रात हजर का राहत नाही?’ असा जाब गडलिंगे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला विचारताना दिसत आहे. त्यानंतर गडलिंगेने त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ केली आणि त्याला निलंबन करण्याची धमकी दिली. 

या संपूर्ण प्रकारणानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी PSI प्रभुदास गंडलिंगे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिली. 

अधिक पाहा..



Source link