Nitin Deshmukh अकोला : मला भाजपच्या एका आमदाराने सांगितलं की, आपण ज्यावेळी सुरतला गेला होता त्यावेळी दिल्लीवरून एक फोन आला होता. कोणत्याही परिस्थितीत नितीन देशमुख परत जाता कामा नये, मारून टाकायचे काम पडले तर गेम करून टाका. तेव्हा टीव्हीवर बातमी पसरवली गेली, मला हृदयविकाराचा झटका आलाय म्हणून. मात्र दिल्लीवरून फोन येतो आणि ऐकत नसेल तर मारून टाका, असे त्यावेळी सांगण्यात आले. हे सर्व मला एका भाजपच्या आमदाराने सांगितले असल्याचा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केला आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यासमोर भाषानातून आमदार देशमुखांनी हे गौप्यस्फोट केला आहे.
माझ्या सोबत घात करण्याचा प्रयत्न झाला- नितीन देशमुख
शिवसेना शिंदे गटाने माझी चौकशी लावली खरी, पण आता माझ्या मुलासह आठव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचीही ACB कडून चौकशी लावलीय. परंतु आपण कधीही डगमगलो नाही. आपण सुरतला गेलो होतो, तेव्हा माझ्या सोबत घात करण्याचा प्रयत्न झाला. मला इंजेक्शन देण्यात आले होते. तेव्हा बातमी पसरली की, आमदार देशमुखांना हृदय विकाराचा झटका आला. आपल्याला कोणताही झटका आला नव्हता असे म्हणत नितीन देशमुखांनी या बाबत स्पष्टीकरण ही दिले आहे. दरम्यान, मला पराभूत करण्यासाठी आज कटकारस्थान रचले जात असल्याचेही आमदार देशमुखांनी यावेळी म्हटले आहे.
मी गद्दारांबरोबर गेलो नाही यामुळे चौकशीचा ससेमिरा
मी वेळोवेळी चौकशीत सर्व माहिती दिली आहे. सातत्याने माझ्या बेहिशोबी मालमत्ते बाबत चौकशी केली जात आहे. 2019च्या निवडणुकीत दाखल केलेल्या अर्जात माजी संपूर्ण संपत्तीची स्थिती नमूद आहे. आता ज्यांनी तक्रार केली आहे त्यांनी बेहिशोबी मालमत्ता कुठे आहे, याची माहिती दिली असेल. दोन वर्षानंतर एसीबीच्या लोकांना जाग येत असेल तर यावर मी काय बोलावं. अशा अधिकाऱ्यांचा सत्कार केला पाहिजे. मी वेल सांगितला तर ते बेल लिहितात. माझी बेहिशोबी मालमत्ता कुठे आहे? ती माझ्या ताब्यात द्यावी आणि माझ्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट मत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
गद्दारांबरोबर मी गेलो नाही. यामुळे चौकशीचा ससेमिरा माझ्या पाठीशी लावण्यात आला आहे. त्या काळातली ही चौकशी झाली पाहिजे. ती का होत नाही? याचे उत्तर कोणाकडेही नाही. माझी चौकशी बंद रूममध्ये नव्हे, तर सर्वांसमोर खुल्या पद्धतीने झाली पाहिजे. असेही मत नितीन देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..