Maharashtra Weather News : जवळपास गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात बरसणाऱ्या पावसानं अद्यापही उसंत घेतली नसून, कैक दिवसांपारून राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सूर्यकिरणांनीही दर्शन दिलेलं नाही. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार बंगालच्या उपसागरासह विदर्भातही कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्या कारणानं राज्याच पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून, पुढील 48 तासांमध्ये प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्र, कोकण घाटमाथा या भागांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मराठवाडा, विदर्भातही पावसाचा जोर वाढणार असून, मुंबईसह या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर राज्याच्या उर्वरित भागांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस हे चित्र कायम राहणार असून, मुंबई, ठाणे, पालघरला पाऊस झोडपणार असल्याचं म्हटलं जात आहे. राज्याच्या समुद्र किनारी भागांमध्येसुद्धा पाऊस दमदार हजेरी लावणार असल्याची शक्यता वर्तवत दरम्यानच्या काळात समुद्र खवळलेला असल्या कारणानं नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. 

दोन नव्हे, चार दिवस पावसाचे…. 

राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्यामुळं पुढील चार ते पाच दिवस सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत काही भागांत अतिवृष्टीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार मध्य भारतावर आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असून त्याच्याच प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि प्रामुख्यानं प्रामुख्याने घाटमाथ्यावर मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाड्यात 18, 19 ऑगस्टदगरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांसह, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या भागांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपातील पाऊस अपेक्षित असल्याचं म्हटलं जात आहे. 

FAQ

महाराष्ट्रात सध्या पावसाची स्थिती काय आहे?
सध्या महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात आणि विदर्भात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने पावसाचा जोर वाढला आहे. पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

कोणत्या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे?
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण घाटमाथा या भागांसाठी पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि कोकणातील काही भागांचा समावेश आहे.

मुंबई आणि आसपासच्या भागांसाठी कोणता अलर्ट आहे?
मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.





Source link