Akola Lok Sabha constituency : देशभरात सध्या सरू असलेल्या सर्वात्रिक लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील निवडणुकांची रणधूमाळीची सांगता झालीय. तर लगेच दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे वेध आता साऱ्याच राजकीय पक्षाना लागले आहे. येत्या 26 एप्रिलला विदर्भ आणि मराठवाड्याच्या आठ मतदारसंघात निवडणुकांची रणधूमाळी रंगणार असून यात अनेक उमेदवारांचे पुढील भवितव्य ठरणार आहे. असे असताना या निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यास आता अवघा तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे लाखों मतदारांपर्यंत पोहचणे हे मोठे आव्हान आता उमेदवारांपूढे असणार आहे. त्यामुळे पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून अखेरचा मास्टर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्नांत आहे. आज आणि उद्या एकट्या अकोला (Akola) मतदारसंघात महाविकस आघाडी (MVA)आणि महायुतीच्या (Mahayuti) दिग्गज नेत्यांची भव्य जाहीर सभा पार पडणार आहेत.
योगी आदित्यनाथ ऐवजी अमित शाहांची अकोल्यात सभा
विदर्भासह मराठवाड्यातील आठ मतदारसंघात येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षानी आपल्या प्रचाराचा मोर्चा त्या दिशेने वळवला आहे.अशातच राजकीय पक्षानी (Mahayuti) आपल्या उमेदवारच्या प्रचारार्थ महाराष्ट्रात मेगा प्लान तयार करण्यात आला आहे. मात्र नुकतीच आकोल्यात (Akola) महायुतीकडून आयोजित अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा अचानक रद्द करण्यात आल्याने मोठे गोंधळ निर्माण झाला होता. शिवाय अनेक राजकीय टीकाटिपणीही झाली होती. यात अगदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सभेचा देखील समावेश होता. मात्र आता पुन्हा भाजपने आपल्या उमेदवारच्या प्रचारार्थ अकोल्यात कंबर कसली आहे.
उद्या, 23 एप्रिलला भाजपचे उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अकोल्यात येते आहेत. दुपारी 3 वाजताच्या अमित शाह यांची अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या पूर्वी 21 एप्रिलला याच मैदानावर योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ही सभा ऐन वेळेवर रद्द करण्यात आली होती. त्यामुळे अमित शाहांना मैदानात उतरवत भाजपचे डॅमेज कंट्रोल करत तर नाहीये ना, असा प्रश्नही या निमित्याने उपस्थित करण्यात येतोय.
आज होणाऱ्या सभा
अकोला मतदारसंघात महाविकास आघाडीचा वतीने काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे त्यांच्या प्रचारार्थ आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अकोला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेतून ते नेमकं कुणावर निशाण साधतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर आज मविआची दुसरी सभा अकोला शहरातील गडंकी येथे आजोजित करण्यात आली आहे. डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या उपस्थितीत ही भव्य जाहीर सभा पार पडणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..