अकोला: अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 70 प्रशिक्षणार्थी मुलींना दुषित पाण्यामुळे विषबाधा, कॉलरा आणि कावीळ झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सर्वात आधी हे प्रकरण ‘एबीपी माझा’ने समोर आणलं होतंय. आज या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याच्या पोलीस प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर अकोल्यात आले. त्यांनी गडंकी भागातील पोलीस प्रशिक्षण केंद्राला (Police Training Center) भेट देत पाहणी केलीय. दरम्यान, या प्रकरणाच्या ‘एसआयटी’ (SIT) चौकशीची मागणी आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्य सरकारकडे केलीये. तर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सरकारला दिले आहेत.

अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील तब्बल 70 हून अधिक महिला पोलिसांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दुषित पाणी प्यायल्याने ट्रेनिंगवर असलेल्या या पोलीस महिला पोलिसांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यात वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे या सर्वांच्या आरोग्यावर परिणाम झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना मळमळ आणि उलट्या (Vomiting) होत होत्या. काल या सर्व महिला पोलिसांना अकोल्यातल्या एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. पोलीस प्रशिक्षण केंद्राने या गंभीर प्रकाराबाबत आधी चुप्पी साधलीय. काल ‘माझा’ने यासंदर्भातील बातमी सर्वात आधी दाखवलीय. आमच्या बातमीनंतर आज या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याच्या पोलीस प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर अकोल्यात आले.

निलम गोऱ्हे यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या राज्यात विविध जिल्ह्यातून पोलीसांत भरती झालेल्या 741 मुली प्रशिक्षण घेतायेत. काल उपचार सुरू असलेल्या खाजगी रुग्णालयात आमदार अमोल मिटकरी, भाजप आमदार रणधीर सावरकर आणि वंचितच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकरांनी भेट दिलीय. दरम्यान, या प्रकरणाच्या ‘एसआयटी’ चौकशीची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारकडे केलीये. तर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सरकारला दिले आहेत.

आणखी वाचा

गूड न्यूज! महाराष्ट्र राज्य पोलीस दलात बंपर भरती, 17471 रिक्त जागांवर भरती

अधिक पाहा..



Source link